
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण त्यासाठी त्याला बरीच वाट पाहावी लागली. याबाबत शाहरूखने व्हिडीओद्वारे आनंदही व्यक्त केला आहे. 3 दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, आता शाहरुख खानला हा सन्मान मिळाला आहे जो भारतातील प्रत्येक अभिनेत्याला हवा असतो. शाहरूखला 'जवान' चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक कमाई देखील केली आहे. पण आजही इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत जे पार लोकप्रिय आहेत. त्यांचे चित्रपट लोक डोक्यावर घेतात. पण त्यांना अद्याप कोणताही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही.

यातीस पहिलाच अभिनेता म्हणजे सलमान खान. सलमानची क्रेझ काय आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आजही वयाच्या 60 व्या वर्षीही तो त्याच्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित करतो. त्याचे चित्रपटही करोडोंची कमाई करतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सलमान खानला आतापर्यंत राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकलेला नाहीये.

त्यानंतर नाव येतं ते 70-80 च्या दशकांतील प्रसिद्ध अभिनेते म्हणजे धर्मेंद्र. या सुपरस्टारने आपल्या उत्तम अभिनयाने आणि धडाकेबाज व्यक्तिमत्त्वाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता ते जवळजवळ 89 वर्षांचे आहेत आणि 7 दशकांपासून काम करत आहे. या सुपरस्टारने त्याच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार जिंकले पण त्यांना अद्यापपर्यंत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही.

देव आनंद त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. त्यावेळी मुलींमध्ये देव आनंद यांचे खूप क्रेझ होते. आजही लोक त्यांच्या शैलीची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. देव आनंद एक सदाबहार अभिनेते होते आणि ते एक सक्षम दिग्दर्शक देखील होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक नवीन स्टार्सना लाँच केलं. परंतु त्यांच्या प्रशंसनीय कामासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही.

शम्मी कपूर त्यांच्या डान्सच्या हटक्या स्टाईलसाठी प्रसिद्ध होते. ते जेव्हा जेव्हा पडद्यावर यायचे तेव्हा ते त्यांच्या लूकने सर्वांना मंत्रमुग्ध करायचे. त्यांचे अनेक चित्रपट ब्लॉकब्लस्टर ठरले आहेत. तरुणांमध्ये त्यांची भलतीच क्रेझ होती. त्यांच्या अभिनयाचेही सर्वजण चाहते होते. परंतु शम्मी कपूर यांना देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकला नाही.

यातील अजून एक महत्त्वाचं नाव म्हणजे संजय दत्त. संजय दत्त गेल्या 4 दशकांपासून चित्रपटसृष्टीत आहे. संजय दत्तच्या बोलण्याच्या स्टाइलपासून ते त्याच्या चालण्याच्या स्टाइलपर्यंत सर्वजण त्याचे चाहते आहेत. आणि अनेकजण त्याला कॉपीही करतात. आता त्याचं वय 66 आहे. पण या वयातही त्याच्या अभिनयाने सर्वांना हसवतो आणि आश्चर्यचिकतही करतो. त्याचे कितीतरी चित्रपट सुपरहिट आहेत. मात्र त्याला अद्यापही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही.