56 वर्षांपूर्वीच्या या गाण्यात दडलाय आयुष्याचा मोठा धडा, हे गाणं ऐकताच आजही प्रेक्षक दिवसभर गुणगुणतात

56 वर्षांपूर्वीच्या या गाण्यात दडलाय आयुष्याचा मोठा धडा. हे गाणं जे Gen-Z पिढीतील आजी-आजोबा आणि पालकांचे प्रचंड आवडते आहे. आजही ऐकू आले तर गुणगुणतात लोक.

56 वर्षांपूर्वीच्या या गाण्यात दडलाय आयुष्याचा मोठा धडा, हे गाणं ऐकताच आजही प्रेक्षक दिवसभर गुणगुणतात
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 06, 2026 | 4:31 PM

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून राज कपूर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यांनी आपल्या अभिनयासोबतच चित्रपटांमधील गाणी आणि कथांमधूनही आयुष्याचे अनेक पैलू प्रेक्षकांसमोर मांडले. त्यांच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातील एक गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. ‘ऐ भाई जरा देखके चलो’ हे 1970 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गाणे असून, तब्बल 56 वर्षांनंतरही त्यातील संदेश तितकाच समर्पक वाटतो.

‘ऐ भाई जरा देखके चलो’ हे गाणे प्रसिद्ध गायक मन्ना डे यांनी आपल्या दमदार आवाजात गायले आहे. शंकर-जयकिशन यांच्या संगीताला गीतकार नीरज यांच्या अर्थपूर्ण शब्दांची साथ लाभली. आयुष्याची तुलना सर्कसशी करत या गाण्यात माणसाला प्रत्येक पाऊल जपून टाकण्याचा संदेश दिला आहे.

Loading...

गाण्याला मिळाला होता सन्मान

आयुष्याच्या या सर्कसमध्ये पुढे, मागे, उजवीकडे, डावीकडे, वर आणि खाली अशा प्रत्येक दिशेला संकटे दडलेली असतात, अशी कल्पना गाण्यातून मांडण्यात आली आहे. माणसाच्या स्वभावावर भाष्य करताना प्राण्यांपेक्षा माणूसच कधी कधी अधिक स्वार्थी आणि विश्वासघातकी ठरतो, हेही गीतकार नीरज यांनी प्रभावीपणे मांडले.

विशेष म्हणजे या गाण्याला मोठा सन्मानही मिळाला. मन्ना डे यांच्या प्रभावी गायनासाठी या गाण्याला 1971 चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 1972 चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याचे सांगितले जाते.

‘मेरा नाम जोकर’ ठरला राज कपूर यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट

‘ऐ भाई जरा देखके चलो’ हे गाणे ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाचा भाग होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि मुख्य भूमिका राज कपूर यांनीच केली होती. चित्रपटात तरुण राजूची भूमिका ऋषी कपूर यांनी साकारली होती. त्यांच्यासोबत सिमी गरेवाल, पद्मिनी, क्षेनिया रयाबिंकिना, मनोज कुमार, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार आणि दारा सिंह यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या.

हा चित्रपट तयार करण्यासाठी राज कपूर यांनी तब्बल सहा वर्षे मेहनत घेतली होती. चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी आपली संपत्ती आणि आर.के. स्टुडिओसह पत्नीच्या सोन्याच्या बांगड्याही गहाण ठेवल्याचे सांगितले जाते.

आजही ‘ऐ भाई जरा देखके चलो’ हे गाणे केवळ एक मनोरंजक गाणं म्हणून पाहिले जात नाही तर आयुष्याच्या अनिश्चिततेची आणि माणसाच्या स्वभावाची जाणीव करून देणारा संदेश देणारे अजरामर गाणं म्हणून त्याची आठवण काढली जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us