Thalapathy Vijay : थलपती विजय याच्या 6 चित्रपटांचा झाला हिंदी रिमेक, बॉलीवूडवर त्यांची जादू चालली का ?

तामिळ सुपरस्टार थलपती विजय याच्या पक्षाला 108 जागांवर मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव निश्चित झाले आहे. अभिनेता विजय याच्या अनेक चित्रपटांचा बॉलीवूडमध्ये रिमेक देखील झाला आहे. कोणते ते पाहूयात...

Thalapathy Vijay : थलपती विजय याच्या 6 चित्रपटांचा झाला हिंदी रिमेक, बॉलीवूडवर त्यांची जादू चालली का ?
vijay thalapathy
| Updated on: May 05, 2026 | 8:58 PM

तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 चे निकाल जाहीर झालेत. तामिळनाडूत थलपती विजय याच्या अवघ्या दोन वर्षांच्या पक्षाने 108 जागांवर विजय मिळवत मुख्यमंत्री पदाच्या दिशेने कूच केले आहे. साऊथ सुपरस्टारने राजकारणात दमदार पाऊल ठेवले आहे. त्याच्या साऊथ चित्रपटाचा दबदबा देखील कायम आहे. साऊथच नाही तर बॉलिवूडमध्ये थलपती विजय याचा जलवा कायम आहे. त्याच्या अनेक चित्रपटाचा बॉलीवूडमध्ये रिमेक झाला आहे. खास म्हणजे त्याच्या दोन चित्रपटाने सलमानचे डुबते करीयर सांभाळले आहे.

थलपती विजय याच्या चित्रपटाचे हिंदी रिमेक

पूवे उनक्काग (1996 ) या चित्रपटाचा ‘बधाई हो बधाई’ (2002) नावाने हिंदी रिमेक झाला होता. यात अनिल कपूर आणि शिल्पा शेट्टी यांची प्रमुख भूमिका होती. ही एक मजेदार रोमँटिक कॉमेडी होती. मात्र, हा चित्रपट हिंदीत फ्लॉप झाला.

प्रियमुदन (1998 ) या चित्रपटचा हिंदी रिमेक ‘दिवाना’ (2013) ज्यात गोविंदा आणि प्रियंका चोपडा होती. हा चित्रपट डिझास्टर ठरला.

कुशी (2000 ) या चित्रपटाचा ‘खुशी’ (2003) नावाने हिंदीत रिमेक झाला. ज्यात फरदीन खान आणि करीना कपूर यांची जोडी होती. हा चित्रपटही हिंदीत आपटला.

लव्ह टुडे (2002) या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘क्या यही प्यार है’ (2002) नावाने रिलीज झाला. यात आफताब शिवदासानी आणि अमिषा पटेल यांनी काम केले होते. हा चित्रपट जेमतेम चालला.

थुप्पाक्की (2012) या चित्रपटाचा रिमेक मात्र ‘हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी’ (2014) नावाने मोठा हीट झाला. यात अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांनी काम केले असून हा एक्शन थ्रिलर प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटाने 112 कोटीहून जास्त कमाई केली आहे.

वरुण धवन याचा ‘बेबी जॉन’ हा विजय थलपती याच्या ‘थेरी’ चित्रपटाचा हिंदी रीमेक होता. या चित्रपटात किर्ती सुरेश कलाकार होते. हा चित्रपट फारसा चालला नाही.या चित्रपटात हॉलिडे हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर प्रचंड चालला, इतर रिमेकने विजय याचा मास अपिल हिंदीत रुपांतरित करु शकला नाही.

 

Follow Us