Video | सनी देओल आणि शाहरुख खान यांच्यामधील वाद अखेर मिटला, किंग खान थेट पोहचला ‘या’ ठिकाणी

बाॅलिवूड अभिनेता सनी देओल हा त्याच्या गदर 2 चित्रपटामुळे सध्या तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटाने मोठा धमाका नक्कीच केलाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. दुसरीकडे शाहरुख खान हा देखील त्याच्या आगामी जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल क्रेझ आहे.

Video | सनी देओल आणि शाहरुख खान यांच्यामधील वाद अखेर मिटला, किंग खान थेट पोहचला या ठिकाणी
| Updated on: Sep 03, 2023 | 3:17 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या गदर 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहे. गदर 2 चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. प्रत्येकजण गदर 2 (Gadar 2) साठी सनी देओल याचे काैतुक करताना दिसत आहे. गदर 2 मध्ये सनी देओल याच्यासोबत अमीषा पटेलही मुख्य भूमिकेत आहे. तब्बल 22 वर्षांनंतर गदर 2 हा धमाका करताना दिसला. या चित्रपटाचे सनी देओल जबरदस्त असे प्रमोशन करताना देखील दिसला.

नुकताच सनी देओल याने आपल्या गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन केले. विशेष म्हणजे गदर 2 च्या सक्सेस पार्टीला बाॅलिवूडच्या अनेक स्टारने हजेरी लावली. या पार्टीतील आता अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर हे देखील या पार्टीत हजर होते.

विशेष बाब म्हणजे सनी देओल याच्या या पार्टीत बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा देखील पोहचला. यावेळी शाहरुख खान याची पत्नी गाैरी खान देखील सोबत दिसली. तब्बल 16 वर्षांपासून सनी देओल आणि शाहरुख खान हे एकमेकांना बोलत नव्हते. डर चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि सनी देओल यांनी एकसोबत काम केले आणि तेंव्हापासूचन दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

आता शाहरुख खान आणि सनी देओल यांच्यामधील वाद मिटल्याचे बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सनी देओल याने खुलासा केला की, शाहरुख खान याने गदर 2 चित्रपट बघितला. गदर 2 चित्रपट बघितल्यानंतर शाहरुख खान याने मला फोन करत काैतुक केले. ज्यानंतर हे स्पष्ट झाले की, यांच्यामधील वाद मिटला आहे.

त्यामध्येच आता शाहरुख खान हा थेट सनी देओल याच्या पार्टीमध्ये सहभागी झाला. शाहरुख खान हा सध्या त्याच्या आगामी जवान चित्रपटामुळे बिझी आहे. शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दुबईच्या क्वबमध्ये खास डान्स करताना शाहरुख खान दिसला. आपल्या चाहत्यांना मोठे सरप्राईज देखील यावेळी शाहरुख खान याने दिले.

आता शाहरुख खान आणि सनी देओल यांच्या चाहत्यांमध्ये मोठा आनंद हा बघायला मिळत आहे. कारण शाहरुख खान आणि सनी देओल यांच्यामधील वाद आता शेवटी मिटला आहे. सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावे केली. गदर 2 यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा दुसऱ्या नंबरचा चित्रपट ठरलाय.