Sunny Deol | सनी देओल याच्यावर अत्यंत गंभीर आरोप, अभिनेत्याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, चाहते हैराण
बाॅलिवूड अभिनेता सनी देओल हा त्याच्या गदर चित्रपटामुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहे. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. सनी दओल याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना देखील दिसले.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहे. गदर 2 हा चित्रपट 22 वर्षांनी जरी प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरीही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ आहे. गदर 2 (Gadar 2) रिलीज झाल्यानंतर लोकांनी थिएटरच्या पुढे मोठ्या रांगा लावल्या. विशेष म्हणजे हे चित्र बऱ्याच वर्षांनी बघायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट काही खास धमाका हे बाॅक्स आॅफिसवर करू शकत नाहीयेत. याला फक्त पठाण आणि आता गदर 2 हे चित्रपटच अपवाद ठरले.
विशेष म्हणजे सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट यंदाचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. मुळात म्हणजे गदर 2 हा चित्रपट तयार करण्यासाठी 60 कोटींचे बजेट होते. गदर 2 चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर 550 कोटींपेक्षाही अधिक कमाई केलीये. यामुळे सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट नक्कीच सुपरहिट ठरला आहे.
गदर 2 चित्रपट जरी हिट ठरला असला तरीही सनी देओल याच्या आयुष्यामध्ये मोठ्या अडचणी या बघायला मिळत आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वीच सनी देओल याला बँक ऑफ बरोडाने त्याच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याच्या लिलावाची नोटीस पाठवली. मात्र, काही तांत्रिक कारण सांगत बँकेने ही नोटीस रद्द केली. सनी देओल हा मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलाय.
सनी देओल हा बँक ऑफ बरोडाचा 55.99 कोटी रुपयांच्या कर्जाचा थकबाकीदार आहे. हे सर्व सुरू असतानाच आता सनी देओल याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. सनी देओल याच्यावर नुकताच एका चित्रपट निर्मात्याने गंभीर आरोप केले आहेत. त्या चित्रपट निर्मात्याचे म्हणणे आहे की, 27 वर्षांपूर्वी सनी देओल याने माझ्याकडे 2 कोटी रूपये घेतले जे अजूनही त्याने परत केले नाहीत.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनी सनी देओल याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप ऐकून चाहत्यांना देखील अत्यंत मोठा धक्का बसलाय. सुनील दर्शन यांच्या मते, सनी देओल याने 1996 मध्ये चित्रपट ‘अजय’च्या वेळी त्यांना आर्थिक मदत मागितली होती. त्यानंतर सुनील दर्शन यांनी तब्बल 2 कोटी रूपये सनी देओल याला दिले.
सनी देओल याने ते पैसे अजूनही मला दिले नाहीत. मी बऱ्याच वेळा त्याला ते पैसे मागितले. मात्र, त्याने नेहमीच त्यावर बोलणे टाळले. यामुळे मी थेट कोर्टात धाव देखील घेतली. मात्र, त्याने कोर्टात सांगितले की, हे पैसे परत करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मग त्याने कोर्टात माझ्या चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले मग कोर्टाने ते प्रकरण मिटवले. मात्र, अजूनही त्याने माझे पैसेही दिले नाहीत आणि चित्रपटात कामही केले नाही, असे सुनील दर्शन यांनी सांगितले.
