प्रसिद्ध अभिनेत्याचा न्यूड व्हिडीओ थेट व्हायरल, एका मिनिटाच्या क्लिपमध्ये…सोशल मीडियावर मोठी खळबळ!

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल हा त्याच्या अभिनयासोबत तो फिटनेसने देखील प्रचंड चर्चेत असतो. अशातच त्याचा न्यूड होऊन झाडावर चढतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याचा न्यूड व्हिडीओ थेट व्हायरल, एका मिनिटाच्या क्लिपमध्ये...सोशल मीडियावर मोठी खळबळ!
| Updated on: Jan 10, 2026 | 6:47 PM

Vidyut Jammwal Video: बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल हा फक्त आपल्या दमदार अभिनयासाठीच नाही तर त्याच्या फिटनेस आणि धाडसी स्टंट्ससाठीही ओळखला जातो. तो नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. यावेळीही विद्युतने असे काही केले आहे ज्यामुळे तो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

शनिवारी विद्युत जामवालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो कोणतेही कपडे न घालता झपाट्याने झाडावर चढताना दिसत आहे. मात्र, त्याने व्हिडीओमध्ये स्वतःची पाठ एका इमोजीद्वारे झाकलेली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी आश्चर्यचकित झाले असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

या व्हिडीओसोबत विद्युतने एक सविस्तर कॅप्शनही लिहिले आहे. त्याने सांगितले की, कलारीपयट्टूचा अभ्यासी म्हणून तो दरवर्षी एकदा सहज योगाचा सराव करतो. सहज म्हणजे नैसर्गिक अवस्था आणि स्वाभाविकतेकडे परत जाणे. ज्यामुळे निसर्गाशी आणि अंतर्मनाशी खोल संबंध निर्माण होतो असे त्याने नमूद केले.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, यामुळे अनेक न्यूरो रिसेप्टर्स आणि प्रोप्रियोसेप्टर्स सक्रिय होतात. ज्यामुळे संवेदनशीलता, संतुलन आणि समन्वय सुधारते. यामुळे शरीराविषयीची जाणीव वाढते. मानसिक एकाग्रता सुधारते आणि स्थैर्याची भावना निर्माण होते असेही त्याने स्पष्ट केले.

हा व्हिडीओ विविध सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. काही चाहत्यांनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देत विद्युत ‘टार्जन’ चित्रपटासाठी सराव करत असल्याची टिप्पणी केली तर काहींनी त्याच्या ‘कमांडो’ भूमिकेचा उल्लेख करत विनोद केला. काहींनी टीका केली असली तरी अनेकांनी ही त्याची वैयक्तिक निवड आहे असे म्हणत त्याच्या निर्णयाचा आदर केला आहे.

अभिनेत्याचा आगामी चित्रपट

दरम्यान, विद्युत जामवालच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे पाहिले तर तो लवकरच हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘स्ट्रीट फायटर’ या चित्रपटातून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करणार आहे. नुकताच त्याने या चित्रपटातील त्याचा लूकही शेअर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन किताओ सकुराई करत असून यात नोआ सेंटिनियो, अँड्र्यू कोजी, कॅलिना लियांग यांसह अनेक कलाकार झळकणार आहेत. ‘स्ट्रीट फायटर’ हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.