Mouni Roy: नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर मौनी रॉय आणि दिशा पटाणी रिलेशनशीपमध्ये? पोस्ट Viral
Mouni Roy: सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मौनी रॉय आणि दिशा पटाणी या लग्नबंधनात अडकल्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही पोस्ट नेमकी काय आहे जाणून घ्या...

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांनी आपला ४ वर्षांचा संसार संपवून परस्पर संमतीने विभक्त होत असल्याची घोषणा केली. मौनीने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही घोषणा केली आहे. त्यांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. दरम्यान, यात अभिनेत्री दिशा पाटनीनेही सूरज नांबियारला अनफॉलो केल्याचे नेटीझन्सच्या लक्षात आले. यामुळे मौनी आणि सूरजच्या ब्रेकअपसाठी दिशा पाटनी जबाबदार असल्याचा दावा करत सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाऊ लागले. या संपूर्ण वादावर मौनी रॉयने सोशल मीडियाद्वारे लोकांना आवाहन केले आहे की, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणत्याही खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवू नयेत आणि तिच्या कुटुंबाला या कठीण काळात प्रायव्हसी (खाजगी स्पेस) द्यावी.
व्हायरल होणारी पोस्ट आहे तरी काय?
दरम्यान, या घटस्फोटाच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर मौनी रॉय आणि तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री दिशा पाटनी यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघींच्या गळ्यात हार दिसतात. या फोटोसोबत एक कथित पोस्ट जोडण्यात आली आहे, ज्यात लिहिले आहे की, “एक अध्याय संपला. मला तिच्यामध्ये माझे आयुष्य सापडले आहे. होय, दिशा आणि मी या प्रेमाच्या नात्याला लग्नात बदलण्यासाठी तयार आहोत. जखमा भरून काढण्यापासून ते कायमच्या आनंदापर्यंतचा हा प्रवास सुरू होतोय.” या व्हायरल पोस्टमुळे दोघींमध्ये प्रेमसंबंध असून त्या लग्न करणार असल्याच्या अफवा वेगाने पसरू लागल्या.
Yenti di nijama???🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/xScLVpVvmb
— Mannuuu🥭 (@Manogna_me) May 16, 2026
व्हायरल पोस्ट मागील सत्य काय?
परंतु, या व्हायरल पोस्टमागे कोणतेही सत्य नसून ती पूर्णपणे खोटी आणि एडिट केलेली आहे. मौनी रॉय आणि दिशा पाटनी यांच्या लग्नाची किंवा नात्याची घोषणा करणारी ही पोस्ट अधिकृत नाही. व्हायरल झालेला फोटो जून २०२५ मधील असून दिशा पाटनीच्या वाढदिवसानिमित्त या दोघी मैत्रिणी इस्कॉन मंदिराला भेट देण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हाचा हा फोटो आहे. या फोटोवरील कॅप्शन आणि मजकूर पूर्णपणे एडिट करून खोटा तयार करण्यात आला आहे. दोन्ही अभिनेत्रींकडून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा किंवा लग्नाचा कोणताही अधिकृत खुलासा किंवा निवेदन जारी करण्यात आलेले नाही.