
मुंबई : 24 सप्टेंबर 2023 | झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटी नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत. अशात ‘आई कुठे काय करते’ मालिकेत महत्त्वाची भूमिका दिसलेली अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने देखील गुपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या गौरी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तुफान चर्चेत आली आहे. चाहते देखील तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. गौरी हिने २३ सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आणि चाहत्यांना गोंधळात टाकलं..
गौरी कुलकर्णी हिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये तिच्या बोटातील नवीकोरी हिऱ्याची अंगठी पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये “Its Happening” असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
गौरी कुलकर्णी हिने पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत आहेत. एवढंच नाही तर, अभिनेत्रीला चाहत्यांनी नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. ‘गौरी कोण आहे तो?’ , ‘साखरपुड्याचे फोटो शेअर कर’, चाहते अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत..
एवढंच नाही तर गौरी कुलकर्णी हिने इन्स्टाग्राम स्टोरी देखील पोस्ट केली आहे. ‘मी आता जी घोषणा केली, त्यावर तुम्ही शुभेच्छांचा वर्षाव केला. मी लवकरच आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.. मला थोडा वेळ द्या…’ असं अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं आहे. त्यामुळे अभिनेत्रीचा नक्की साखरपुडा झाला आहे की नाही लवकरच कळेल..
गौरी कुलकर्णी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.