AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 17 | कधी सुरु होणार ‘बिग बॉस 17’? प्रोमोमध्ये सलमान खान दिसला वेगळ्या अंदाजात

Bigg Boss 17 | 'बिग बॉस 17' ची सर्वत्र चर्चा... प्रोमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता पोहोचली शिगेला... कधी सुरु होणार 'बिग बॉस 17'... प्रोमोमध्ये सलमान खान दिसला हटके अंदाजात... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'बिग बॉस 17' ची चर्चा...

Bigg Boss 17 | कधी सुरु होणार 'बिग बॉस 17'?  प्रोमोमध्ये सलमान खान दिसला वेगळ्या अंदाजात
| Updated on: Sep 24, 2023 | 12:34 PM
Share

मुंबई : 24 सप्टेंबर 2023 | टीव्ही विश्वातील सर्वात वादग्रस्त ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) शो सध्या सर्वत्र तुफान चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी शोचा एक प्रोमो पोस्ट करण्यात आला होता. पण तेव्हा शोच्या प्रिमियर डेटची घोषणा करण्यात आली नव्हती. पण आता पोस्ट करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) शोच्या प्रिमियर तारखेची देखील घोषणा करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस 17’ शोची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, लेटेस्ट प्रोमोमध्ये अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने चाहत्यांची उत्सुकता देखील वाढवली आहे. चाहते देखील आता ‘बिग बॉस 17’ च्या प्रतीक्षेत आहेत.

‘बिग बॉस ओटीटी 2’ शो यशस्वी झाल्यानंतर सलमान खान पुन्हा ‘बिग बॉस’ या वादग्रस्त शोचा पुढचा भाग शूट करण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस 17’ शोचा पहिला प्रोमो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. निर्मात्यांनी कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार्‍या ‘बिग बॉस 17’ चा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

एवढंच नाही तर, ‘बिग बॉस 17’ शो कधी प्रसारित होणार याची घोषणा देखील केली आहे. प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘यावेळी प्रेमाची होणार परीक्षा…काही जिंकतील, तर काही हारतील…’ अलं लिहिलं आहे. बिग बॉसमध्ये घरातील सदस्यांना प्रेमात कठीण परीक्षा द्याव्या लागतील… असं सलमान खान प्रोमोमध्ये बोलताना दिसत आहे.

‘बिग बॉस 17’ मध्ये अनेक स्पर्धक बिग बॉसच्या घरात येणार आहेत. ‘बिग बॉस 17’ शो 15 ऑक्टोबरपासून रात्री 9 वाजता सुरू होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर 24 तास लाइव्ह पाहू शकता. सध्या सर्वत्र बिग बॉसची चर्चा सुरु आहे.

‘बिग बॉस 17’ मधील स्पर्धक

‘बिग बॉस 17’ मधील स्पर्धकांची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा जोर धरत आहे. अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, अर्जित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि अरमान मलिक यांसोबत अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी ‘बिग बॉस 17’ मध्ये स्पर्धक म्हणून असतील असं सांगण्यात येत आहे.

बईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
बईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....