खोलीत बंद केलं, चुकीची औषधं दिली… आमिर खानवर भावाकडून गंभीर आरोप, कुटुंबाकडून मोठा खुलासा

Aamir Khan Family Issues: खोलीत बंद केलं, चुकीची औषधं दिली..., आमिर खानवर भावाने केलेले आरोप खरे आहेत की खोटे? कुटुंबाकडून मोठा खुलासा, सध्या सर्वत्र आमिर खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

खोलीत  बंद केलं, चुकीची औषधं दिली... आमिर खानवर भावाकडून गंभीर आरोप, कुटुंबाकडून मोठा खुलासा
फाईल फोटो
| Updated on: Aug 12, 2025 | 11:06 AM

Aamir Khan Family Issues: अभिनेता आमिर खान सध्या भाऊ फैजल खान याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत फैजल याने भाऊ आमिर खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमिर खान याने मला 1 वर्ष खोलीत बंद ठेवलं. मला चुकीची औषधं दिली… मला वेड लागलं आहे… असं त्याचं म्हणणं होतं… आमिरचा माझ्यावर दबाव होता… असं देखील फैजल म्हणाला. यावर आता आमिर खान याच्या कुटुंबाने मोठा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कुटुंबाने सत्य परिस्थिती सांगितली आहे. सध्या आमिर खान याचं कुटुंब तुफान चर्चेत आहे…

आमिर खानच्या कुटुंबाने फैजल खानच्या आरोपांबाबत अधिकृत निवेदन जारी केलं आहे आणि त्यांच्या आरोपांना दुःखद म्हटलं आहे. फैजलने लावलेल्या आरोपांवर खान कुटुंबाचं म्हणणं आहे की, ही पहिली वेळ नाही जेव्हा फैजल याने गंभीर आरोप केले आहेत. याआधी देखील त्याने असं केलं आहे. फैजलने केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही… असं कुटुंबाने म्हटलं आहे.

पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, ‘माध्यमांकडून सहानुभूतीची विनंती… फैसलने त्याची आई झीनत ताहिर हुसेन, बहीण निखत हेगडे आणि भाऊ आमिर यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद आणि दिशाभूल करणाऱ्या टिप्पण्यांमुळे आम्हाला दुःख झालं आहे. ही पहिली वेळ नाही जेव्हा फैजल याने गोष्टी चुकीच्या पद्धतीने समोर आणल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आमचा हेतू स्पष्ट करायचा आहे… कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. हे सांगणं महत्त्वाचं आहे की फैसलशी संबंधित प्रत्येक निर्णय कुटुंबाने अनेक डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर एकमताने घेतला आहे. ‘

 

 

‘फैजल संबंधी घेण्यात आलेला प्रत्येक निर्णय प्रेम आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी घेण्यात आले. म्हणून आम्ही आमच्या कुटुंबासाठी असलेल्या या वेदनादायक आणि कठीण काळाबद्दल सार्वजनिकपणे बोलणं टाळलं. आम्ही माध्यमांना सहानुभूती दाखवण्याची आणि खाजगी प्रकरणाला अफवा, नको त्या चर्चांमध्ये रूपांतरित करण्यापासून दूर राहण्याची विनंती करतो.’ सध्या आमिर खान याच्या कुटुंबाने केलेली सोशल मीडिया पोस्ट तुफान चर्चेत आहे.

काय म्हणाला होता फैजल खान?

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत फैजल याने आमिर खान याच्यावर गंभीर आरोप केले. ‘आमिर खान याने मला जवळपास 1 वर्ष खोलीत बंद केलं होतं. मी वेडा आहे… असं कुटुंबियांना वाटत होतं. आमिरने माझा फोन देखील घेतलेला. माझ्या खोलीबाहेर बॉडीगार्ड ठेवले होते. ज्यामुळे मी खोलीच्या बाहेर येऊ शकत नव्हतो… ‘ पण , काही काळानंतर त्याची मानसिक स्थिती तपासण्यात आली आणि त्याला मानसिकदृष्ट्या स्थिर घोषित करण्यात आलं.