इम्रान खानसोबतच्या नात्याला ‘लव्ह जिहाद’चा लेबल… वेदना व्यक्त करत गर्लफ्रेंड म्हणाली..

आमिर खान याच्या भाच्याने सोडली बायको आणि मुलीची साथ... गर्लफ्रेंडसोबत असलेल्या नात्याला 'लव्ह जिहाद'चा लेबल... तिने मनातील वेदना व्यक्त करत म्हणाली... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त इम्रान खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

इम्रान खानसोबतच्या नात्याला लव्ह जिहादचा लेबल... वेदना व्यक्त करत गर्लफ्रेंड म्हणाली..
| Updated on: Feb 21, 2026 | 11:05 AM

बॉलिवूडचा लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याचा भाचा इम्रान खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. इम्रान हा अभिनेता लेखा वॉशिंगटन हिच्यासोबत 2020 पासून रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, ‘हॅप्पी पटेल : खतरनाक जासूस’च्या स्क्रिनिंगमध्ये इम्रान आणि लेखा यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. पण ट्रोलर्सने दोघांच्या नात्याला ‘लव्ह जिहाद’चा लेबल दिला. पण आता लेखा हिने खासगी आयुष्यावर ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. इम्रान याच्यासोबत असलेल्या नात्याल ‘लव्ह जिहाद’ असा लेबल दिल्यानंतर लेखा हिने मौन सोडलं आहे.

ट्रोल करणाऱ्यांना लेखाने चांगलेच खडेबोल सुनावले

सांगायचं झालं तर, तब्बल 10 वर्षांनंतर इम्रान ‘हॅप्पी पटेल : खतरनाक जासूस’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे… अशात सिनेमाच्या प्रिमियर दरम्यान अभिनेत्याला लेखा हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. दोघांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला. पण अनेकांनी व्हिडीओ ‘लव्ह जिहाद’ अशी कमेंट केली आहे.

यावर लेखा हिने चांगलंच सुनावलं आहे. ‘लव्ह जिहाद – असं वाटतं माझ्यासोबत होत आहे… मी थोडी बर्मी, इटालियन, पंजाबी आहे. साऊथ इंडियामध्ये मी वाढली आहे… मी उत्तर भारतात एका वडिलांसोबत आली आहे जे रोमन कॅथोलिक आहे पण अज्ञेयवादी आहे. मला अशा व्यक्तीसोबत जोडलं जात आहे, ज्याचे वडील थोडे हिंदू थोडे स्कॉटिश आणि आई मुस्लिम आहे आणि लोक याला लव्ह जिहाद म्हणत आहेत.

पुढे लेखा म्हणाली, ‘माझ्या कुटुंबाचे विचार स्वतंत्र आहे आणि ते सर्वांचा सन्मान करतात… असंच माझ्या जोडीदाराचं कुटुंब देखील आहे… बहुसांस्कृतिक, विशाल, दयाळू, सर्जनशील आणि समावेशक लोकांचं कुटुंब एकमेकांना इतक्या सुंदरपणे कसा आधार देतो हे मला पाहायला मिळतं. मी किती भाग्यवान आहे.’

माझी स्वतःची ओळख आहे..

लेखा वॉशिंग्टन हिने एका गोष्टीवर देखील जोर दिला आणि तो म्हणजे, ती फक्त एका अभिनेत्याची गर्लफ्रेंड नाही, तिची स्वतःची देखील वेगळी ओळख आहे. लेखा म्हणाली, ‘कोणत्याही महिलेला फक्त तिच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत मर्यादित ठेवायचं नाही… पण हा आपल्या समाजाचा एक भाग आहे. एक मुख्य अभिनेत्री म्हणून मी अनेक वर्ष काम केलं आहे. जेव्हा मला कळलं महिलांचा तिस्कार प्रचंड आहे… तेव्हा मी स्वतःला त्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला..’ असं देखील लेखा म्हणाली.

इम्रान खान याची पहिली बायको आणि मुलगी…

इम्रान खान याच्या पहिल्या बायकोचं नाव अवंतिका मलिक असं आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण मुलीच्या जन्मानंतर देखील दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. बायकोला घटस्फोट दिल्यानंतर इम्रान याने लेखा हिच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली. आता दोघे एकमेकांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहेत.