AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2: 1000 कोटी कमावणाऱ्या ‘धुरंधर 2’बद्दल अखेर आमिर खानने सोडलं मौन; म्हणाला..

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2' या चित्रपटावर नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल आमिर नेमकं काय म्हणाला, ते जाणून घ्या..

Dhurandhar 2: 1000 कोटी कमावणाऱ्या 'धुरंधर 2'बद्दल अखेर आमिर खानने सोडलं मौन; म्हणाला..
Aamir Khan and Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 27, 2026 | 8:36 AM
Share

गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षकांना ज्या चित्रपटाची प्रतीक्षा होती, तो ‘धुरंधर: द रिव्हेंज’ अखेर 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासून थिएटर्समध्ये गर्दी करायला सुरुवात केली. गेल्या सात दिवसांत या चित्रपटाने जगभरात कमाईचा 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षक-समिक्षकांसोबतच इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडूनही या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक होत आहे. कंगना राणौत, अल्लू अर्जुन, रजनीकांत, अनुपम खेर, आलिया भट्ट, महेश बाबू यांसारख्या कलाकारांनी ‘धुरंधर 2’ची प्रशंसा करणारे पोस्ट सोशल मीडियावर लिहिले आहेत. परंतु बॉलिवूडमधील शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी अद्याप या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली नव्हती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरला या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

काय म्हणाला आमिर खान?

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार ‘धुरंधर 2’चं कौतुक करत असताना अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांसारखे बॉलिवूडमधील मोठे कलाकार का गप्प आहेत, असा सवाल वारंवार सोशल मीडियावर उपस्थित केला जात होता. अखेर नुकत्याच एका मुलाखतीत आमिरने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणाऱ्या ‘धुरंधर 2’बद्दल तुझी काय प्रतिक्रिया आहे, असा प्रश्न आमिरला विचारला असता ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “हा चित्रपट खूप चांगली कामगिरी करतोय, असं मी ऐकलंय. परंतु मी अद्याप ‘धुरंधर 2’ पाहिलेला नाही. पण या चित्रपटाबद्दल फक्त प्रशंसाच ऐकतोय. ‘धुरंधर 1’ आणि आता ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अतुलनीय कामगिरी केली आहे. मी या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देतो.”

‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. पहिल्या भागाने जगभरात 1300 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आता दुसरा भाग त्याचाही विक्रम मोडणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. या चित्रपटात रणवीर सिंह, आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत. जवळपास चार तासांच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पहायला मिळतेय. या चित्रपटाचा पहिला भाग सध्या नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...