AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’ पाहून रजनीकांत यांनी केली अशी पोस्ट; वाचून दिग्दर्शकही भारावला!

Dhurandhar 2: साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी आदित्य धरच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाविषयी एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांना हा चित्रपट कसा वाटला, त्याविषयी रजनीकांत यांनी लिहिलं आहे.

Dhurandhar 2: 'धुरंधर 2' पाहून रजनीकांत यांनी केली अशी पोस्ट; वाचून दिग्दर्शकही भारावला!
Rajinikanth and Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 24, 2026 | 9:16 AM
Share

सध्या थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. फक्त प्रेक्षकच नाही तर बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीसुद्धा या चित्रपटाचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. अल्लू अर्जुन, विजय देवरकोंडा, महेश बाबू यांसारख्या दाक्षिणात्य कलाकारांनी सोशल मीडियावर ‘धुरंधर 2’चं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यात आता ‘थलायवा’ रजनीकांत यांचीही भर पडली आहे. साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

रजनीकांत यांची पोस्ट-

‘धुरंधर 2.. काय चित्रपट आहे! आदित्य धर.. बॉक्स ऑफिसचा बाप. रणवीर आणि संपूर्ण कास्ट, क्रू मेंबर्सचं अभिनंदन. प्रत्येक भारतीयाने पहावा असा हा चित्रपट आहे. जय हिंद’, अशा शब्दांत रजनीकांत यांनी कौतुक केलं आहे. रजनीकांत यांनी अशी पोस्ट लिहिणं म्हणजे कोणत्याही कलाकारासाठी ही गोष्ट स्वप्नवत वाटते. आदित्य धरच्या बाबतीत असंच काहीसं झालं आहे.

रजनीकांत यांच्या या पोस्टवर त्याने लिहिलं, ‘आम्ही सर्वजण मनोरंजन हे फक्त एकाच मापदंडाने मोजत मोठे झालो आहोत आणि तो मापदंड म्हणजे तुम्ही आहात. अनेक दशकांपासून आम्हाला हसायला, रडायला, आनंदात शिट्टी वाजवायला भाग पाडून, आमच्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करून आजही त्यात दिमाखात आणि सहजतेने हे सर्व करणं म्हणजे ही निव्वळ जादू आहे. त्यामुळे तुम्ही ‘धुरंधर 2’ला ‘मस्च वॉच’ (आवर्जून पहावा असा) म्हणणं हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा सुपरस्टार क्षण आहे. ज्या व्यक्तीने आम्हा सर्वांना मोठी स्वप्नं पाहण्याचं शिकवलं, त्याच व्यक्तीकडून आशीर्वाद मिळाल्यासारखं आहे. हे थेट माझ्या मनाला भिडलं आहे.’

‘धुरंधर 2’चे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे जवळपास सर्व विक्रम मोडले आहेत. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने भारतात 500 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी रणवीरच्या या चित्रपटाने 65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे भारतातील कमाईचा एकूण आकडा 519.12 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा 2026 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...