अंबानींच्या कार्यक्रमात का नाचलास? आमिर खानने दिलं चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खानने एकत्र डान्स केला. यावरून एका नेटकऱ्याने आमिरला प्रश्न विचारला. त्यावर आमिरने उत्तर दिलं आहे.

अंबानींच्या कार्यक्रमात का नाचलास? आमिर खानने दिलं चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर
आमिर खान, सलमान खान, शाहरुख खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 3:15 PM

मुंबई : 7 मार्च 2024 | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने काही काळ कामातून ब्रेक घेतला होता. आता त्याने पुन्हा शूटिंगला सुरुवात केली आहे. ‘सितारे जमीन पर’ हा त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने त्याने लाइव्ह इन्स्टाग्राम सेशनमध्ये नेटकऱ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. या सेशनदरम्यान अनेकांनी आमिरला ट्रोलसुद्धा केलं. या ट्रोलिंगवर मौन न बाळगता त्याने उत्तर दिलं आहे. त्याने नेटकऱ्यांचे कमेंट्सदेखील वाचून दाखवले. एका चाहत्याने आमिरला त्याचा स्टायलिस्ट बदलण्याचा सल्ला दिला. त्यावर आमिर म्हणाला, “हे कपडे चांगले तर दिसतायत. माझी स्टाइल अनोखी आहे, त्यामुळे बहुतांश लोकांना ती आवडत नाही.”

अंबानींच्या कार्यक्रमात आमिर का नाचला?

आणखी एका ट्रोलरने आमिरबद्दल कमेंट करताना लिहिलं, ‘सर तुम्ही ड्रग्ज घेतल्यासारखं दिसतंय. ड्रग्ज घेणं थांबवा.’ आमिरने ही कमेंटसुद्धा वाचून त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘क्या बोल रहे हो यार (काय बोलतोय यार)’ असं तो म्हणाला. एका युजरने आमिरला अंबानींच्या कार्यक्रमात नाचण्याविषयीही प्रश्न विचारला. ‘अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमध्ये तुम्ही का नाचलात? मुलगी आयराच्या लग्ना का नाचला नाहीत?’, असा सवाल संबंधित युजरने केला. त्यावर उत्तर देताना आमिर म्हणाला, ‘मी माझ्या मुलीच्याही लग्नात नाचलो. अंबानींबद्दल बोलायचं झाल्यास, ते खूप चांगले फॅमिली फ्रेंड्स आहेत. आपण एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमात नाचतोच.’

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Maha (@mahasrk1)

आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा सीक्वेल नसल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं. “हा चित्रपट तुम्हाला हसवेल, तुमचं मनोरंजन करेल. पण हा तारे जमीन पर या चित्रपटाचा सीक्वेल नक्कीच नाही. या चित्रपटाची कथा आणि त्यातील भूमिका वेगळ्या आहेत”, असं त्याने सांगितलं. 2022 मध्ये आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर त्याने अभिनयातून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं होतं. करीना कपूरसोबतचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता.

जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अवघं बॉलिवूड अवतरलं होतं. या कार्यक्रमात शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी स्टेजवर एकत्र डान्स केला. यावेळी साऊथ सुपरस्टार रामचरणनेसुद्धा त्यांच्यासोबत ठेका धरला होता.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.