राखी सावंतच्या पूर्व पतीने गुपचूप केलं दुसरं लग्न? नवरीचं सलमान खानशी कनेक्शन

इस्लाम धर्म स्वीकारून अभिनेत्री राखी सावंतने कथित प्रियकर आदिल खान दुर्रानीशी निकाह केला होता. मात्र निकाहनंतर काही महिन्यांतच त्यांच्यात वाद सुरू झाले. आता घटस्फोटानंतर आदिलने गुपचूप दुसरं लग्न केल्याचं कळतंय.

राखी सावंतच्या पूर्व पतीने गुपचूप केलं दुसरं लग्न? नवरीचं सलमान खानशी कनेक्शन
आदिल खान, राखी सावंतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 11:23 AM

मुंबई : 7 मार्च 2024 | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानीचं नातं बराच काळ चर्चेत होतं. या दोघांनी अचानक लग्न केलं आणि लग्नाच्या काही महिन्यांतच राखीने आदिलवर गंभीर आरोप केले. इतकंच नव्हे तर आदिलला तुरुंगातही जावं लागलं होतं. आता त्याने जयपूरमध्ये गुपचूप पद्धतीने लग्न केल्याची माहिती समोर येत आहे. 2 मार्च रोजी आदिलने जयपूरमध्ये ‘बिग बॉस 12’च्या स्पर्धकाशी निकाह केल्याचं कळतंय. या लग्नाला काही मोजकी मंडळीच उपस्थित होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, आदिलने ‘बिग बॉस 12’ची स्पर्धक सोमी खानशी लग्न केलंय. सोमी ही सबा खानची बहीण आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांनी रिलेशनशिपबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती.

सोमी आणि सबा खान या दोघी बहिणी सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस 12’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. या दोघी बहिणी जयपूरच्या असून इंडस्ट्रीत काम करण्यासाठी मुंबईला आल्या होत्या. सबा आणि सोमी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी काही म्युझिक व्हिडीओजमध्येही काम केलंय. बिग बॉसच्या बाराव्या सिझनची विजेती टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर ठरली होती. बिग बॉसमध्ये असताना सोमी आणि दीपक ठाकूर यांच्यातील भांडणं अनेकदा चर्चेचा विषय ठरायची. सोमी आणि आदिल यांची भेट कशी झाली, हे दोघं रिलेशनशिपमध्ये कसे आले याविषयीची माहिती अद्याप समोर आली नाही.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by SOMI KHAN (@somikhan_ks)

राखीने तक्रार दाखल केल्यानंतर आदिलला पोलिसांनी अटक केली होती. त्यावर आरोप करताना राखी म्हणाली होती, “मी आदिलला माफ केलं होतं आणि त्याला पुन्हा माझ्यासोबत संसार करण्याची विनंती केली. पण त्याने ऐकलं नाही. तो म्हणाला, मी तुला सोडू शकतो पण तिला नाही. मग आता जर तो तिला सोडू शकत नसेल तर मी त्याला सोडणार नाही. आदिलला अटक केल्यानंतर कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याला पोलीस कोठडी मिळावी यासाठी आम्ही गेल्या आठ दिवसांपासून प्रयत्न करतोय. त्याच्यावर दुसरे खटलेसुद्धा दाखल आहेत.”

आदिलशी लग्न करण्यासाठी राखीने इस्लाम धर्म स्वीकारला होता. मात्र लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला आदिलने तिला स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हापासून राखी माध्यमांसमोर येऊन आदिलविरोधात विविध आरोप करू लागली होती. आदिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचंही तिने म्हटलं होतं. तनू चंडेल असं त्या मुलीचं नाव आहे, हा खुलासाही तिने केला होता.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.