Aamir Khan : 61 व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा करणार लग्न, पहिले दोन संसार का मोडले ? पूर्व पत्नी काय करतात ?

Aamir Khan Wedding : अभिनेता आमिर खान लवकरच तिसरं लग्न करणार आहे. 5 जुलै रोजी आमिर आणि गौरी लग्नबंधनात अडकणार आहेत. यापूर्वी आमिरची दोन लग्न झाली होती, मात्र ते विभक्त झाले. त्याची पहिली आणि दुसरी पत्नी कोण, काय करतात त्या दोघी ?

Aamir Khan : 61 व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा करणार लग्न, पहिले दोन संसार का मोडले ? पूर्व पत्नी काय करतात ?
अभिनेता आमिर खान
| Updated on: Jun 04, 2026 | 10:14 AM

Aamir Khan First and Second Wedding : मि. परफेक्शनिस्ट नावाने ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे, कामामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडीच जास्त लाइमलाइटमध्ये आहेत. वयाच्या 61 व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे वृत्त आहे. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसह तो येत्या 5 जुलै रोजी लग्नबंदनात अडकणार आहे. एका प्रायव्हेट सारंभात, दोघंही लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. आमिरने 60 व्या वाढदिवशी गौरी स्प्रॅटसोबतच्या त्याच्या नात्याची कबुली दिली होती. गर्लफ्रेडं म्हणून तिची जगाला ओळख करून दिली. आता ते लौकरच लग्नबंधनात अडकतील.

मात्र गौरीशी लग्न करण्यापूर्वी आमिर खान याचं आधी 2 वेळा लग्न झालं आहे. पहिली पत्नी रीना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण राव हिच्याशी त्याचं नातं बराच कल होतं. मात्र अखेर ते वेगळे झाले. आमिर खानचं पहिलं आणि दुसरं लग्न का तुटलं, त्याच्या पूर्व पत्नी आता काय करतात, जाणून घेऊया..

आमिर खानचे लव्हलाइफ एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा वेगळे नाही. त्याने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी रीना दत्ताशी पहिले लग्न केलं, मात्र नंतर ते वेगळे झाले. त्यानंतर वयाच्या 40 व्या वर्षी त्याने किरण रावशी दुसरे लग्न केलं. घटस्फोटानंतरही, आमिर खानचे त्याच्या दोन्ही माजी पत्नींसोबत चांगले संबंध आहेत. मात्र, त्याचं पहिलं आणि दुसर लग्न मोडण्यामागचं कारण फार कमी लोकांना माहीत आहे.

आमिर खानचं पहिलं लग्न

अभिनेता आमिर खानने 1986 साली रीना दत्तासोबत पहिले लग्न केलं. त्यावेळी ते शेजारी होते आणि हळूहळू त्यांच्यात प्रेम जुळलं. आमिर आणि रीनाने त्यांच्या कुटुंबांच्या इच्छेविरुद्ध खूप लहान वयात (आमिर 21 वर्षांचा आणि रीना 19 वर्षांची) लग्न केले. रीना आणि आमिर यांना जुनैद आणि आयरा अशी दोन मुलं आहेत. मात्र, त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही आणि 16 वर्षांनंतर 2002 साली त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. आमिरने स्वतः कबूल केलं होतं की, त्यावेळी तो चित्रपटांमध्ये पूर्णपणे गुंतलेला होता आणि कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हता. याच कारणांमुळे, 16 वर्षांच्या नात्यानंतर आमिर आणि रीनाने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

रीना दत्ता काय करते ?

रीना दत्ता लाइमलाइटपासून दुर असते. मात्र तरी, ती सामाजिक आणि धर्मादाय कार्यांमध्ये सक्रिय आहे. तसंच, तिला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतं. ती सध्या मुंबईतील तिच्या घरी राहते आणि आपली मुलगी आयरा खानच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात असते.

आमिरचं दुसरं लग्न

रीनाशी घटस्फोट झाल्यानतर, तीन वर्षांनी 2005 साली आमिर खानने किरण रावशी दुसरं लग्न केलं. किरण आमिरपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. ‘लगान’नंतर त्यांची प्रेमकथा सुरू झाली. त्यांच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झालं आणि ते लग्नाआधी एकत्र राहू लागले. त्यानंतर 2011 साली मध्ये त्यांचा मुलगा आझाद याचा जन्म झाला. मात्र, त्या दोघांचं नातंही फार काळ टिकलं नाही. 2021 साली आमिर आणि किरण विभक्त झाले.

किरण राव काय करते ?

किरण राव ही सुप्रसिद्ध चित्रपट निर्माती, दिग्दर्शिका आणि दिग्दर्शिका आहे. ती सध्या मुंबईत राहते आणि आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसला त्यांच्या प्रोजेक्टमध्ये मदत करते. ते दोघे मिळून त्यांचा मुलगा आझादचे संगोपन (co-parenting) करतात.

Follow Us