AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Nepal : नेपाळ पुन्हा तेच काम करणार, ज्यामुळे भारताला येतो राग, आपण आधीच आक्षेप घेतलाय

India-Nepal : मागच्या काही काळात भारत-नेपाळ संबंध ताणले गेले आहेत. नवं बालेन शाह सरकार आल्यानंतर ही दरी अधिकच रुंदावली आहे. कारण बालेन शाह सरकार सातत्याने भारतविरोधी भूमिका घेत आहे.

India-Nepal : नेपाळ पुन्हा तेच काम करणार, ज्यामुळे भारताला येतो राग, आपण आधीच आक्षेप घेतलाय
India-Nepal
| Updated on: Jul 26, 2026 | 2:08 PM
Share

नेपाळ सरकारने एक रुपयाचं नवीन नाणं आणण्याचा निर्णय घेतला आहे. पण या नाण्यावर नेपाळचा वादग्रस्त नकाशा असणार आहे. या नकाशामध्ये लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानीला नेपाळचा भाग दाखवण्यात आलं आहे. या तीन प्रदेशावरुन भारत आणि नेपाळमध्ये दीर्घकाळापासून सीमावाद सुरु आहे. लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानीवर नेहमीच नेपाळने दावा केला आहे. भारताचं म्हणणं आहे की, हे तिन्ही भाग उत्तराखंडचा हिस्सा आहेत. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या माध्यमातूनच यावर तोडगा निघावा ही भारताची भूमिका आहे. नेपाळच्या राष्ट्र बँकेचे प्रवक्ते गुरु प्रसाद पौडेल यांनी शनिवारी सांगितलं की, केंद्रीय बँक एक रुपयांचा नवीन शिक्का जारी करेल.बँकेला अजूनपर्यंत शिक्क्याचं अंतिम डिझाइन मिळालेलं नाही. पण नेपाळ राष्ट्र बँकेला विश्वास आहे की, नव्या शिक्क्यावर तोच नकाशा असेल , ज्यात तिन्ही वादग्रस्त प्रदेशांना नेपाळमध्ये दाखवलं आहे.

मे 2020 मध्ये पहिल्यांदा हा वाद चर्चेत आलेला. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान के.पी.शर्मा ओली सरकारने नेपाळचा नवी अधिकृत नकाशा जारी केला होता. त्यात लिंपियाधुरा,लिपुलेख आणि कालापानीला नेपाळमध्ये दाखवलेलं. 20 जुलैला नेपाळ सरकारने ठरवलेलंकी, एक रुपयाच्या नाण्यावरील नेपाळचा नकाशा हटवून त्याजागी बौद्ध मठाचा (मोनास्ट्री) फोटो लावायचा. पण या निर्णयाला विरोधी पक्ष आणि सर्वसामान्य लोकांनी विरोध केला. लोकांच्या वाढत्या दबावामुळे हा निर्णय बदलण्यात आला. आता नाण्यावर नकाशा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत-नेपाळ सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत

नेपाळ राष्ट्र बँकेनुसार, नव्या नाण्याचा आकार आणि धातू आधीच्या शिक्क्यापेक्षा वेगळा असेल. नवं नाणं आधीच्या तुलनेत आकाराने छोटं आणि हलकं असेल. पण त्यावर नेपाळचा वादग्रस्त नकाशाच छापला जाईल. नेपाळच्या या निर्णयाने भारत-नेपाळ सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संवेदनशील सीमा प्रश्नावर केवळ द्विपक्षीय चर्चेतूनच तोडगा निघेल हे भारताचं पहिल्यापासूनचं मत आहे. मागच्या काही काळात भारत-नेपाळ संबंध ताणले गेले आहेत. नवं बालेन शाह सरकार आल्यानंतर ही दरी अधिकच रुंदावली आहे.

Follow Us
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंचं भाषण...
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची गर्दी
Thackeray Sabha Video | एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची मोठी गर्दी
एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील Video...
एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल