
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची क्रेझ पाहायला मिळते. हा शो गेल्या 16 वर्षांपेक्षाही अधिक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. या शोमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच सर्वांची आवडती पात्रे ही एका सोसायटीमध्ये राहतात. तसेच शोची कथा या सोसायटीमधील लोकांच्या भोवती फिरताना दिसते. या सोसायटीचे नाव गोकुळधाम आहे. ही सोसायटी बाहेरून पाहिल्यास इतर सोसायटींसारखीच दिसते. तुम्ही कधी विचार केला आहे का, की या सोसायटीमध्ये किती घरे आणि किती फ्लॅट्स आहेत? चला, या सेटशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया…
शोमध्ये रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बेनिवाल यांनी एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. त्यांना गोकुळधामबद्दल विचारण्यात आले होते की, गोकुळधाम सोसाइटीमध्ये किती खोल्या आहेत? या प्रश्नाच्या उत्तरात अभिनेत्रीने अनेक गोष्टी सांगितल्या. जेनिफर यांनी सांगितले की, तिथे कोणत्याही खोल्या नाहीत.
दोन वेगवेगळे सेट
जेनिफर यांनी सांगितले की, तुम्ही पाहता ती गोकुळधाम सोसायटी दोन वेगवेगळ्या सेट्सवर आहे. बाहेरचा सेट वेगळा आहे आणि घरांच्या आतील भागाचा सेट वेगळा आहे, जिथे शोचे शूटिंग होते. त्यांनी सांगितले की, बाहेरचा सेट पूर्णपणे लाकडाचा बनलेला आहे आणि त्यात खोल्या अजिबात नाहीत. जेव्हा तुम्ही एखाद्या घरात आत जाता, तिथे एक भिंत येते. जिथे घराच्या आतील शूटिंग होते, ती पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी होते.
कुठे होते शूटिंग?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सोसाइटीचा सेट मुंबईतील गोरेगांव येथील फिल्मसिटीमध्ये तयार करण्यात आला आहे. हा सेट आतून रिकामा आहे, पण तो दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. एका भागात गोकुळधाम सोसाइटीचा बाह्य भाग आहे आणि दुसऱ्या भागात गोकुळधामवासीयांचे सर्व फ्लॅट्स आहेत. जर एखाद्या घरात आतील शूटिंग करायची असेल, तर ती शूटिंग या सेटवर नव्हे, तर कांदिवली येथे केली जात असे. मात्र, आता ही जागा बदलली आहे. हा शो अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि सर्वांना आवडतो.