हा बॉलिवूड चित्रपट जवळपास 6 महिने थिएटरमध्ये हाऊसफुल होता; गाणे तर आजही आहेत सुपरहीट

बॉलिवूडचा असा एक चित्रपट जो तब्बल 6 महिने थिएटरमध्ये हाऊसफुल राहिला. महेश भट्ट दिग्दर्शित हा चित्रपट आणि या चित्रपटातील गाणीही सुपरहिट राहिली आहेत. या चित्रपटाला चक्क चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. हा चित्रपट कोणता आहे माहितीये?

हा बॉलिवूड चित्रपट जवळपास 6 महिने थिएटरमध्ये हाऊसफुल होता; गाणे तर आजही आहेत सुपरहीट
Aashiqui,
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 02, 2025 | 1:47 PM

बॉलिवूडमध्ये असे फार कमी चित्रपट आहेत जे महिना किंवा दोन महिन्यापर्यंत थिएटरमध्ये हाऊसफूल राहिला असेल. पण एक असा चित्रपट होता ज्याने सगळे रेकॉर्ड मोडले होते. हा चित्रपट तब्बल 6 महिने हा चित्रपट थिएटरमध्ये हाऊसफुल होता. एवढंच नाही तर चित्रपटातील सर्व गाणे सुपरहीट होते आणि आजही आहेत. तसेच या चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री देखील या चित्रपटानंतर रातोरात स्टार झाले. हा कोणता चित्रपट आहे आणि तो इतका लोकप्रिय का बनला हे जाणून घेऊयात.

चित्रपट 6 महिने थिएटरमध्ये हाऊसफुल 

ज्या चित्रपटाने आणि त्याच्या गाण्यांनी सर्वांच्या मनावर राज्य केलं, जो चित्रपट एक किंवा दोन महिने नाही तर तब्बल 6 महिने थिएटरमध्ये हाऊसफुल राहिला तो चित्रपट म्हणजे “आशिकी“. 17 ऑगस्ट 1990 रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट दिग्दर्शित “आशिकी” हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाने लोकांना वेड लावलं. या चित्रपटानंतर राहुल रॉय आणि अनु अग्रवाल ही सुपरहिट जोडी ठरली. “आशिकी” सहा महिने हाऊसफुल्ल चालला यावरून चित्रपटाच्या विक्रमी यशाचा अंदाज नक्कीच लावता येतो.

चित्रपटाने आणि त्याच्या गाण्यांनी सर्वांच्या मनावर राज्य केलं

“आशिकी” चे निर्माते गुलशन कुमार होते आणि दिग्दर्शक महेश भट्ट  होते.  हा संगीतमय चित्रपट हिट झाला आणि राहुलला रोमँटिक हिरो आणि लव्हर बॉय अशी पदवी मिळाली. मॉडेलिंग करणारा मुलगा त्याच्या पहिल्याच चित्रपटात सुपरस्टार होईल अशी कल्पना कोणीही केली नसेल. चित्रपटातील “बस एक सनम चाहिये आशिकी के लिए” आणि “नजर के सामने जिगर के पास” ही गाणी तर प्रत्येकाच्या तोंडी होते. यामुळे प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी होत गेली. त्या वेळी प्रत्येक रस्त्यावर आणि परिसरात फक्त आशिकीच्या कॅसेट्स वाजत होत्या. चित्रपटात राहुल आणि अनु व्यतिरिक्त, या चित्रपटात दीपक तिजोरी देखील होते. त्याच्याकडे रीमा लागू, टॉम अल्टर आणि अनंग देसाई सारखे अनुभवी कलाकार होते.

चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले

नदीम आणि श्रवण यांनी संगीतबद्ध केलेल्या “आशिकी” चित्रपटातील प्रत्येक गाणे हृदयला भिडणारे आहे. त्याच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतामुळे, चित्रपटाने संगीत श्रेणीतील चारही फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. सर्वोत्कृष्ट संगीतापासून ते सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक तसेच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कारही मिळाला. या चित्रपटासाठी गुलशन कुमार यांच्या उत्कृष्ट संगीताच्या प्रचंड यशामुळे नदीम-श्रवण जोडी सुपरहिट झाली