Badlapur News : तू वस्तू आहेस, वस्तू भोगल्या – उपभोगल्या जातात…, मराठी अभिनेत्याची संतापजनक पोस्ट

Badlapur News : 'तू एक वस्तू आहेस, वस्तू कधी... ', दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार... बदलारपूरकरांचा आक्रोश, मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर संतापजनक पोस्ट करत केला निषेध, पोस्टवर नेटकरी देखील संताप व्यक्त करत आहेत....

Badlapur News : तू वस्तू आहेस, वस्तू भोगल्या - उपभोगल्या जातात..., मराठी अभिनेत्याची संतापजनक पोस्ट
बदलापूर अत्याचार प्रकरण
| Updated on: Aug 22, 2024 | 8:56 AM

Badlapur News : शाळा म्हणजे विद्यांर्थ्यांचं दुसरं घर… शाळा हे विद्येचं मंदिर आहे, तसंच ते संस्काराचं एक महत्त्वाचं माध्यम असं देखील म्हणतात… पण या मंदिरात आता चिमुकल्या मुली सुरक्षित नाहीत. त्यामुळे पालकांच्या मनात मुलींसाठी भीती निर्माण झाली आहे. बदलापूर येथील नामांकीत शाळेत घटलेल्या धक्कादायक घटनेनंतर जनसामान्यांमध्ये संतापाची भावना आहे. शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर, शाळेतील सफाई कर्मचारी होता. घटना समोर येताच बदलापूरमधील या जनआक्रोश आंदोलनाने सरकारला हलवून सोडलय. आता फक्त बदलापूरकरचं नाही तर, संपूर्ण महाराष्ट्र घटनेचा निषेध व्यक्त करत आहे.

मराठी सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिव्र संताप व्यक्त करत आहेत. अभिनेता आस्ताद काळे, जुई गडकरी  यांसारख्या अनेक मराठी सेलिब्रिटींना घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. मराठी सेलिब्रिटींनी केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

अभिनेता आस्ताद काळे दुःख व्यक्त करत मुली तू फक्त एक वस्तू आहेस… असं म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे. ‘मुली…तू नोकरी करू नकोस…, मुली…तू व्यवसाय करू नकोस…, मुली…तू कॉलेजला जाऊ नकोस…, मुली…तू शाळेत जाऊ नकोस…, तुझ्या आसपासच्या अनेकांच्या दृष्टीत तू एक वस्तू आहेस. वस्तू कधी हे सगळं करतात का? वस्तू फक्त वापरल्या जातात. भोगल्या-उपभोगल्या जातात…विनातक्रार…मुली…तू फक्त वापरली जा…’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल होत आहे.

अभिनेत्री जुई गडकरी हिने देखील भारतातील प्रत्येक कोपऱ्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री पोस्ट करत म्हणाली, ‘कोलकाता, बिहार, दिल्ली, बदलापूर वगैरे…यांना डायरेक्ट पब्लिक धुलाईला द्या….कसले पुरावे हवे आहेत अजून…कसली वाट बघतोय आपण…किळस येते अक्षरशः…संताप होतो…गल्लिच्छ राक्षस…बदलापूरमध्ये जे झालं तसं व्हायला हवंय…कॅन्डल्स जाळून काही होत नाही.’ असं अभिनेत्री म्हणाली.

सांगायचं झालं तर, बदलापूर घटनेनंतर सर्वत्र संतापाटी लाट उसळली आहे. नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. आता न्यायालय नराधामाला कोणती शिक्षा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर नराधमाला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे… अशी मागणी प्रत्येकाकडून होत आहे…