AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मज्जाच मज्जा! ‘आता होऊ दे धिंगाणा’चा चौथा सिझन, प्रेक्षकांची वाढली उत्सुकता

'आता होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाच्या तिन्ही सिझन्सना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. याचं सूत्रसंचालनसुद्धा सिद्धार्थ जाधवच करणार आहे. या शोचा नवीन प्रोमो नुकसाच प्रदर्शित झाला आहे.

आता मज्जाच मज्जा! 'आता होऊ दे धिंगाणा'चा चौथा सिझन, प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
Siddharth JadhavImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 16, 2025 | 3:50 PM
Share

‘आता होऊ दे धिंगाणा’च्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. रोजच्या धकाधकीच्या जीवनात निखळ मनोरंजनाचे क्षण घेऊन येणारा हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापलीकडेही आवडीने पाहिला जातो. प्रेक्षकांचा हा लाडका कार्यक्रम चौपट मजा आणि चौपट धमाल घेऊन पुन्हा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 9 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता ‘आता होऊ दे धिंगाणा’चं चौथं पर्व सुरु होत आहे. चौथ्या पर्वात प्रेक्षकांना थीमपार्कची जादू अनुभवता येणार आहे. थीमपार्कमध्ये ज्याप्रमाणे अद्भूत आणि अविश्वसनीय गोष्टींची सफर घडते, अगदी त्याप्रमाणेच धिंगाणाचा मंच भन्नाट गेम्सच्या माध्यमातून मनोरंजनाची धमाल सफर घडवणार आहे. मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या स्मायली काय गायली, धुऊन टाक, गोरी गोरी पान गाते किती छान या सुपरहिट फेऱ्या नव्या ट्विस्टसोबत या पर्वातही असणार आहेत. याच्या सोबतीला अनेक नव्या अतरंगी फेऱ्या देखिल पाहायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या तीन पर्वात ज्या फेरीची सर्वाधिक चर्चा रंगली त्या साडे माडे शिंतोडेचं भव्यदिव्य रुप या पर्वाचं प्रमुख आकर्षण ठरेल.

अभिनेता सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे. चौथ्या पर्वाविषयी सांगताना सिद्धार्थ जाधव म्हणाला, “तुमचा कार्यक्रम कधी बंद होणार यापेक्षा तुमचा कार्यक्रम कधी सुरु होतोय याची जेव्हा प्रेक्षकांकडून विचारणा होते, तेव्हा तेच त्या कार्यक्रमाचं यश असतं. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की इतकं यश आता होऊ दे धिंगाणाला मिळेल. या कार्यक्रमाचा चौथा सिझन करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय. प्रेक्षकांप्रमाणेच मी सुद्धा या पर्वाची वाट पाहत होतो. आता होऊ दे धिंगाणा म्हणजे १००% मनोरंजनाची हमी. नव्या जोशात आणि नव्या ढंगात चौथं पर्व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

स्टार प्रवाहच्या परिवारातल्या कलाकार मंडळींसोबत यंदाचं पर्व नव्या जोशात रंगणार आहे. दोन मालिकांच्या टीममधली सांगितीक लढत प्रेक्षकांसाठी पर्वणी असेलच, पण त्यासोबतच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गंमती-जंमतीही या मंचावर उलगडतील. हा अनोखा आणि भन्नाट कार्यक्रम 9 ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?