नेतेमंडळी विधान परिषदेत व्यस्त, अभिजीत बिचुकलेंचं राष्ट्रपतीपदावर लक्ष!, लवकरच अर्ज भरणार

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी तशी घोषणा केली आहे.

नेतेमंडळी विधान परिषदेत व्यस्त, अभिजीत बिचुकलेंचं राष्ट्रपतीपदावर लक्ष!, लवकरच अर्ज भरणार
आयेशा सय्यद

|

Jun 18, 2022 | 11:24 AM

मुंबई : सध्या महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. राजकीय नेते या विधानपरिषद निवडणुकीत व्यस्त आहेत. पण अभिजीत बिचुकले (Abhijit Bhichukale) यांचं लक्ष मात्र एका वेगळ्या निवडणुकीकडे आहे. बिचुकले सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या (Presidential Election) तयारीला लागलेत. ते राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी खासदारांचा पाठिंबा मिळवत आहेत. महाराष्ट्रसह इतर राज्यातील खासदारही संपर्कात असल्याचं बिचुकले यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

अभिजीत बिचुकले राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी तशी घोषणा केली आहे. त्यासाठी ते ठरवून दिलेल्या 50 खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

बिचुकले काय म्हणाले?

अभिजीत बिचुकले यांच्याशी आम्ही याविषयी संवाद साधला तेव्हा त्यांनी “मी या निवडणुकीसाठी इच्छूक आहे. मला ही निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी मी काही खासदारांचा पाठिंबा मिळवत आहे आणि येत्या काही दिवसातच मी निवडणूक अर्ज दाखल करेन”, असं सांगितलं.

संभाजीराजेंना पाठिंबा का नाही?

यावेळी बोलताना त्यांनी राज्यसभा निवडणुकीवर भाष्य केलं. “छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ राजकारण करणाऱ्यांनी त्यांचे वंशज असणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांना राजकीय पक्षांनी पाठिंबा का दिला नाही?”, असा प्रश्न त्यांनी विचारला.

हे सुद्धा वाचा

अभिजीत बिचुकले कोण आहेत?

अभिजीत बिचुकले हे आपल्याला बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये दिसले होते. यात त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलमुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. शिवाय ते बिग बॉस हिंदीच्या 15 व्या सिझनमध्येही दिसले होते. त्यांनी याआधीही अनेक निवडणुका लढवल्या आहेत. याआधीही त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आहे. शिवाय उदयनराजेंच्या विरोधातही निवडणूक लढवली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें