
बॉलिवूडचा अभिनेता अभिषेक बच्चन सध्या चर्चत आहे ते त्याला मिळालेल्या फिल्मफेअर पुरस्कारामुळे. कारण 25 वर्षांच्या मेहनतीनंतर अभिषेकला हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्याने ऐश्वर्यासाठी केलेल्या भावनिक विधानामुळे देखील चर्चा होताना दिसत आहे. तसेच त्यावर ऐश्वर्याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या दोघांमधी हे प्रेम चाहत्यांसाठी देखील सुखावणारा क्षण होता.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित जोडप्यांपैकी एक मानले जातात. गेल्या काही काळापासून या जोडप्यात काही मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्यावर दोघांनीही कधी प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तसेच सध्याच्या त्यांच्या या पोस्टमुळे दोघांमधील प्रेम अजूनही बहरलेलंच आहे असं दिसून येतं.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायची जोडी पडद्यावर देखील तेवढीच रोमँटीक आणि परिपूर्ण दिसली. त्यांनी एकत्र बरेच चित्रपट केले. पण हे फार जणांना माहित असेल की या जोडीची खरी प्रेमकहाणी कोणत्या चित्रपटापासून सुरु झाली ते.
अभिषेक आणि ऐश्वर्याची जोडी पहिल्यांदा कोणत्या चित्रपटात दिसली?
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही जोडी पहिल्यांदा 2000 मध्ये एकत्र दिसली होती आणि तेव्हापासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे ढाई अक्षर प्रेम के. या रोमँटिक ड्राम्यात ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली. “ढाई अक्षर प्रेम के” मधील ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनची जोडी चांगलीच गाजली.
त्यानंतर कुछ ना कहो हा 2003 मध्ये आलेला त्यांचा दुसरा चित्रपट. हा चित्रपट हलक्याफुलक्या कथेसह रोमँटिक आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्याची जोडी दिसली ते 2006 मध्ये आलेल्या उमराव जान या चित्रपटात. हा चित्रपट 1981 च्या क्लासिक चित्रपटाचा रिमेक आहे. ऐश्वर्याने चित्रपटात एका वेश्याची भूमिका साकारली आहे. तर अभिषेकने तिच्या प्रियकराची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हीट झाला नसला तरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ऐश्वर्या- अभिषेक 2006 मध्येच आलेल्या धूम 2 मध्ये देखील एकत्र दिसले.
या चित्रपटाच्या सेटवर फुलली दोघांची लव्हस्टोरी
पण त्यांची खरी प्रेमकहाणी फुलली ती 2007 मध्ये आलेल्या ‘गुरु’ चित्रपटाच्या सेटवर. याआधीच्या चित्रपटांमध्ये काम करताना ते फक्त चांगले मित्र होते. त्यावेळी, ऐश्वर्या तेव्हा सलमान खानला डेट करत होती असं म्हटलं जातं. गुरु चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या आणि अभिषेकची प्रेम फुललं.हा चित्रपट प्रेक्षकांच्याही खूप पसंतीस उतरला.आजही या चित्रपटातील गाणी हीट आहेत. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांचे जोडीदार बनले.