AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Bachchan- Aishwarya Rai : मुंबई, लंडन नव्हे, या शहरात सुरू झाली ऐश्वर्या-अभिषेकची लव्हस्टोरी, मुलीचंही खास कनेक्शन; इतक्या वर्षानंतर…

अभिषेक बच्चनने जयपूर पिंक पँथर्स कबड्डी संघाची मालकी घेण्यामागचे खास कारण उघड केले. त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत एक किस्साही त्याने यावेळी सांगितला.

Abhishek Bachchan- Aishwarya Rai : मुंबई, लंडन नव्हे, या शहरात सुरू झाली ऐश्वर्या-अभिषेकची लव्हस्टोरी, मुलीचंही खास कनेक्शन; इतक्या वर्षानंतर...
अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय
| Updated on: Aug 19, 2026 | 6:06 PM
Share

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)  हा फक्त हिंदी चित्रपटांशीच निगडीत नाही, तर त्यासोबतच तो एका कबड्डी टीमचाही मालक आहे. 2014 साली अभिषेकने अशा एका गेममध्ये गुंतवणूक केली , जो गेम त्याच्यासाठछी खूपच खास आहे. जयपूर पिंक पँथरची निवड का केली, हे अभिषेकने नुकतंच जाहीर केलं. त्यामागे खास कारण आहे आणि ते त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी देखील निगडीत आहे. खरंतर हे तेच शहर आहे, जिथून अभिषेक आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांची लव्हस्टोरी सुरू झाली. पिंक आणि पँथरशीही त्याचं खास कनेक्शन आहे.

जयपूरमधून सुरू झालं डेटिंग

अभिषेकने अलीकडेच PWC इंडियाचे चेअरपर्सन संजीव कृष्णन यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी जयपूर शहराशी असलेल्या आपल्या जिव्हाळ्याबद्दल तो भरभरून बोलला. एवढंच नव्हे तर त्याचे वडील, अर्थात दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना खेळ किती आवडतो हेही त्याने आवर्जून सांगितलं. जयपूर हे शहर माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे, असं अभिषेक म्हणाला. कारण याच ठिकाणी माझ्या पहिल्या चित्रपटाचं थोडं शूटिंग झालं होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, याच शहरात मी आणि ऐश्वर्याने एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती, असं अभिषेकने नमूद केलं. त्यामुळे या शहराशी माझा एक भावनिक संबंध आहे. गुलाबी रंगही माझ्यासाठी खास आहे, कारण त्या काळात तो माझ्या मुलीचा आवडता रंग होता, असंही अभिषकेने यावेळी बोलताना सांगितलं.

लहानपणी मला माझे बाबा ‘पँथर’ या नावाने हाक मारायचे. हा आमच्यातला एक मजेशीर संवादाचा भाग होता. आता त्याच ‘पिंक पँथर’ नावाची कबड्डी टीम माझ्याकडे आहे, असा खास किस्साही अभिषेकने यावेळी आवर्जून सांगितला.

इतक्या कलाकारांना समोर पाहून टीमवर आला दबाव …

यावेळी अभिषेकने सांगितलं की तो आपल्या टीमसोबत फक्त मालक म्हणून नव्हे, तर खेळाडूंच्या अगदी जवळ राहून सहभागी व्हायचा. सामन्याच्या काही आठवडे आधी तो खेळाडूंसोबत ट्रेनिंग करायचा, त्यांच्यासोबत जेवायचा आणि त्यांच्या डाएटवरही लक्ष ठेवायचा. एवढंच नाही, तर खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या आलू पराठ्यांवरही त्याने प्रश्न उपस्थित केला होता! पण टीमच्या पहिल्या सामन्यात एक वेगळीच ‘स्टार पॉवर’ पाहायला मिळाली. खेळाडू मैदानात उतरले आणि समोर अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान असे अनेक दिग्गज बसले होते, मागे ऐश्वर्या रायही होती. . एवढ्या मोठ्या कलाकारांना आणि दिग्गजांना समोर पाहून टीममधील खेळाडूंचे लक्ष खेळावर केंद्रित करता येत नव्हतं. त्यांचा फोकसच उडाला होता, असा मजेशीर किस्सा त्याने सांगितला. अभिषेकच फक्त कबड्डी टीमचा नव्हे तर फूटबॉल टीमचाही मालक आहे.

Follow Us
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ...
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य