AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी तुमच्यासोबत झोपू का…; अभिषेक बच्चनने टॉप अभिनेत्रीकडे केली होती मागणी!

अभिषेक बच्चनला आपलं वैयक्तिक आयुष्य अत्यंत खाजगी ठेवायला आवडतं. पण तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्यापेक्षा 24 वर्षांनी मोठ्या असलेल्या एका हसीनावर फिदा होता आणि तिच्यासोबत झोपण्याची इच्छाही व्यक्त केली होती? कोण आहे ती हसीना आणि काय आहे हा किस्सा, चला जाणून घ्या...

मी तुमच्यासोबत झोपू का...; अभिषेक बच्चनने टॉप अभिनेत्रीकडे केली होती मागणी!
abhishek-bachchan
| Updated on: Oct 04, 2025 | 4:25 PM
Share

अभिषेक बच्चन हा बॉलिवूडमधील असा स्टार आहे, जो आपल्या शांत स्वभाव आणि साधेपणासाठी ओळखला जातो. लहानपणापासूनच त्याने इंडस्ट्रीला जवळून पाहिलं आहे. वडील अमिताभ बच्चन आणि आई जया बच्चन दोघेही इंडस्ट्रीतील नावाजलेले तारे होते, त्यामुळे लहानपणापासूनच तो चित्रपटांच्या सेटवर फिरत होता आणि अनेक नायिकांशी संवाद साधायचा. अभिषेक बच्चनची प्रेम प्रकरणेही चांगलीच चर्चेत राहिली. पण त्याने नेहमीच या नात्यांबद्दल बोलणं टाळलं आणि नंतर ऐश्वर्या रायला बच्चन कुटुंबाची सून बनवून या सर्व अफवांवर कायमस्वरूपी पूर्णविराम लावला. पण तुम्हाला माहीत आहे का या सुंदर हसीनावर अभिषेक बच्चन खूप प्रेम करायचा.

तुम्हीही असाच विचार करत आहात का की अभिषेक बच्चन नेमकं कोणावर इतकं प्रेम करायचा? तुमचा विश्वास बसेल का की त्याने एकदा त्या अभिनेत्रीला असंही विचारलं होतं, ‘मी तुमच्यासोबत झोपू का…’ त्यानंतर त्या अभिनेत्रीने दिलेलं उत्तर थक्क करणारं आहे.

वाचा: जगातली सगळेच तरुण दिसणार म्हातारे, बाबा वेंगाची हादरवणारी भविष्यवाणी! कोणत्या वर्षी येणार हे संकट

अभिषेकने स्वत: सांगितला होता किस्सा

आपल्या पहिल्या प्रेमाचं रहस्य अमिताभ बच्चनच्या लाडक्या मुलाने स्वतः उघड केलं होतं. त्याने ‘यारों की बरात’ या टीव्ही शोमध्ये हा खुलासा केला होता. अभिनेत्याने सांगितलं की 1983 मध्ये आलेल्या ‘महान’ चित्रपटाचं शूटिंग काठमांडूमध्ये सुरू होतं. मीही तिथे गेलो होतो आणि कलाकारांसोबत खूप मजा करायचो. एके दिवशी शूटिंगनंतर आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवलो आणि मग सर्वजण झोपण्यासाठी हॉटेलमध्ये जायला निघाले.

‘मी तुमच्यासोबत झोपू का…’

अभिषेक बच्चनने सांगितलं, चित्रपटात जीनत अमान होत्या आणि त्या माझं पहिलं प्रेम होत्या. सर्वजण झोपण्यासाठी जायला निघाले तेव्हा त्या उठल्या, मी त्यांना विचारलं- ‘जीनत आंटी, तुम्ही कुठे चालल्या आहात?’ त्यांनी सांगितलं- ‘मी रूमवर चालले आहे.’ मग मी म्हणालो ‘का चालल्या आहात…’ त्यांनी सांगितलं ‘झोपायला चालले आहे.’ मग मी म्हणालो, ‘तुम्ही एकट्या झोपता का?’ अभिषेक म्हणाला की आम्ही लहान होतो, त्यामुळे आम्हाला एकटं झोपण्याची सवय नव्हती… त्यांनी सांगितलं, ‘हो, मी एकटीच झोपते.’ जीनत अमान यांनी हे बोलताच अभिषेक पटकन म्हणाला, ‘मी तुमच्यासोबत झोपू का…’

‘आधी थोडं मोठं हो, मग झोप…’

अभिषेकच्या या बोलण्यानंतर जीनतही गप्प बसल्या नाहीत. अभिषेकने पुढे सांगितलं की कदाचित त्यांनी म्हटलं, ‘आधी थोडं मोठं हो, मग झोप…’ हा किस्सा ऐकून सर्वांना हसू अनावर झाले होते. शोमध्ये उपस्थित असलेले संजय दत्त, अजय देवगन, रितेश देशमुख आणि साजिद खान यांना हसू अनावर झाले होते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.