अभिषेक बच्चनची 280 करोडची संपत्ती, अभिनयाव्यतिरिक्त तो या कामातूनही करतो करोडोंची कमाई

अभिषेक बच्चन 280 करोड रुपयांचा मालक आहे. मात्र त्याची नेटवर्थ आता जास्त चर्चेत येत आहे. कारण ही कमाई त्याने फक्त चित्रपटांमधूनच नाही तर इतर अनेक कामांमधून तो करोडोंची कमाई करतोय. त्याची गुंतवणूक जाणून नक्कीच धक्का बसेल.

अभिषेक बच्चनची 280 करोडची संपत्ती, अभिनयाव्यतिरिक्त तो या कामातूनही करतो करोडोंची कमाई
| Updated on: Feb 03, 2025 | 5:07 PM

अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या चित्रपटामुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळे जास्तच चर्चेत असतो. मात्र वादांवर किंवा चर्चांवर त्याने एकदाही भाष्य केलं नाही. पण सध्या अभिषेक चर्चेत आहे ते त्याच्या नेटवर्थमुळे. कारण त्याची सध्याची नेटवर्थ पाहायला गेलं तर ती जवळपास 280 करोडच्या आसपास आहे. पण अभिषेक फक्त चित्रपटांच्या माध्यमातूनच नाही इतर अनेक कामांमधूनही तो कमाई करतो.दरम्यान अभिषेक बच्चन 5 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून तो 48 वर्षांचा होईल.

अभिषेक बच्चनने गेल्या काही वर्षांत चांगली संपत्ती निर्माण केली

अभिषेक अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तेव्हापासून अभिषेक बच्चनच्या करिअरमध्ये बरेच चढ-उतार आले. अभिषेकच्या काही चित्रपटांनी फारशी कमाई केली नसली तरी काही चित्रपटांच्या माध्यमातून त्याने चाहत्यांचे मन जिंकले आहे. गुरू आणि पा सारखे अनेक उत्कृष्ट चित्रपटही त्याने दिले आहेत. अभिषेक बच्चनने गेल्या काही वर्षांत चांगली संपत्ती निर्माण केली आहे.

अभिषेक बच्चनची नेटवर्थ

एका रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चन 280 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. अभिषेक अनेक ब्रँडचा मालक आहे. एवढच नाही तर तो जाहिरातींच्या माध्यमातूनही कमाई करतो. अभिषेक बच्चन प्रो कबड्डी लीग फ्रँचायझी संघ जयपूर पिंक पँथर्सचा मालक आहे. तसेच एबी कॉर्प या प्रॉडक्शन हाऊसचा मालकही आहे.

अभिनयाव्यतिरिक्त इतर कामांमधून करोडोंची कमाई

एवढंच नाही तर त्याने रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे. 2020 ते 2024 या कालावधीत अभिषेकने वडिलांसोबत 220 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. अलीकडेच त्याने 24.95 कोटी रुपयांना 10 अपार्टमेंट खरेदी केल्याची माहितीही समोर आली आहे. तर अशा अनेक कामांमधून आणि इन्व्हेसमेंटमधून करोडोंची गुंतवणूक आणि कमाई करतो.

टीम इंडियाचा विजय साजरा केला

दरम्यान टीम इंडियाने रविवारी रात्री इंग्लंड विरुद्धचा पाचवा आणि शेवटचा T20I सामना जिंकल्यामुळे, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा केला. सामना थेट पाहण्यासाठी पिता-पुत्र मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हजर होते. विजयानंतर, ते एका शानदार डिनरसाठी कॅफेमध्ये गेले होते, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिषेकच्या कामाबद्दल…

अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर  तो आता हाऊसफुल 5 आणि बी हॅप्पीमध्ये दिसणार आहे.