प्रेक्षक चित्रपट पाहण्यात मग्न होते अन्…भयंकर घडलं, महावतार नरसिंहा चित्रपट सुरु असताना मोठी दुर्घटना
गुवाहाटीतील पीव्हीआर थिएटरमध्ये "महावतार नरसिंह" चित्रपट पाहताना एक भयानक घटना घडली. चित्रपट प्रदर्शनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आणि चित्रपट तात्काळ थांबवण्यात आले. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
महावतार नरसिंहा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा एक अॅनिमेटेड पौराणिक चित्रपट असूनही, तो सर्व वयोगटातील लोकांना आवडताना दिसत आहे, हा चित्रपट लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडताना दिसत आहे. ही जादुई गाथा पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. दरम्यान, गुवाहाटीमध्ये चित्रपट सुरु असताना थिएटरमध्ये असताना एक विचित्र घटना घडली.
तीन जण गंभीर जखमी झाले
रविवारी रात्री गुवाहाटीतील पीव्हीआर थिएटरमध्ये ‘महावतार नरसिंहा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान मोठी दुर्घटना घटना घडली. प्रेक्षक चित्रपट पाहण्यात मग्न असताना अचानक छताचा एक भाग त्यांच्यावर कोसळला आणि सर्वजण खूप घाबरले आणि सैरावैरा पळू लागले. या घटनेत मुलांसह तीन जण जखमी झाल्याचं समजतंय. थिएटरमधील फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
स्क्रीनिंग ताबडतोब थांबवली
या घटनेनंतर, चित्रपट तात्काळ थांबवण्यात आला. तातडीने जखमींवर उपचार करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी प्रेक्षकांना थिएटरमधून सुरक्षितपणे बाहेर निघण्यास मदत केली आणि आता थिएटर बंद करण्यात आले आहे. तथापि, अद्याप अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतेही अधिकृत विधान आलेलं नाही.
Ceiling Collapse at #Guwahati @_PVRCinemas.During Movie Screening, 3 Injured Including Children.Sudden mishap triggered panic among audience as fragments of ceiling fell on heads of 3 people including children. At time of incident, film #narsimhaavatar was being screened#injury pic.twitter.com/SrrWIp8A4d
— Nikita Sareen (@NikitaS_Live) August 4, 2025
अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट 25 जुलै रोजी प्रदर्शित झाला आणि मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा करूनही तो बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. एका रिपोर्टनुसार या चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 81.25 कोटी रुपये कमावले आहेत. हा चित्रपट पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
होम्बले फिल्म्स आणि क्लीम प्रॉडक्शन्सने या अॅनिमेटेड फ्रँचायझीसाठी अधिकृतपणे लाइनअप देखील लाँच केले आहे. ज्यामध्ये भगवान विष्णूच्या दहा दैवी अवतारांवर चित्रपट बनवले जातील. महावतार नरसिंह (2025), महावतार परशुराम (2027), महावतार रघुनंदन (2029), महावतार धावकादेश (2031), महावतार गोकुलानंद (2033), महावतार कल्की भाग 1 (2035), आणि महावतार कल्की भाग 2 (2037).
