
सिनेविश्व हे फक्त चमचमणारं किंवा ग्लॅमरसच नाही. तर त्याच्या पडद्यामागे असंख्य अशा कहाण्या आहेत, जिथे कलाकारांना त्यांना खऱ्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतोय. परंतु हा संघर्ष अनेकांच्या समोर येत नाही. अर्थातच सिनेसृष्टीत अयशस्वी कलाकारांची संख्या ही यशस्वी कलाकारांपेक्षा खूप जास्त आहे. कित्येकजण प्रतिभावान असूनही चांगल्या कामाच्या आणि संधीच्या शोधात असतात. तर काहींना काम मिळत नसल्याने आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं. असाच एक अभिनेता, ज्याची सुरुवात इंडस्ट्रीत जोरदार झाली, परंतु आता तो स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करतोय. त्याचं नाव आबे अभिनय किंगर.
44 वर्षीय अभिनय किंगर सध्या गंभीर लिवरच्या आजाराशी झुंज देत आहे. शारीरिक समस्या असतानाच तो आर्थिकदृष्ट्याही बराच संघर्ष करतोय. बेरोजगारी आणि देखभालीसाठी जवळ कोणीच नसल्याने त्याला औषधांचा आणि रोजच्या जीवनातील खर्च भागवणंही कठीण जात आहे. एका मुलाखतीत अभिनये खुलासा केला होता की, त्याला सतत सरकारी मेसच्या जेवणावर अवलंबून राहावं लागतंय. “आता माझे काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत”, अशा शब्दांत त्यांनी दयनीय अवस्था मांडली होती.
मल्याळम अभिनेता अभिनय किंगर हा प्रसिद्ध दिवंगत अभिनेते टीपी राधामणी यांचा मुलगी आहे. अभिनयच्या वडिलांनी तमिळ आणि मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलं होतं. 2019 मध्ये कॅन्सरने वडिलांच्या निधनानंतर त्याची परिस्थिती आणखी बिकट झाली. त्याने 2002 मध्ये धनुषसोबत ‘थुल्लुवधो इलमई’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती.
धनुषचा भाऊ सेल्वा राघवन लिखित आणि वडील कस्तुरी राजा दिग्दर्शित या चित्रपटातील अभिनयच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं होतं. त्यानंतर त्याला ‘जंक्शन’ या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली होती. त्याच वर्षी त्याने मल्याळम चित्रपटसृष्टीतही पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो ‘पोन मेगालाई’, ‘थोडाक्कम’, ‘सोल्ला सोल्ला इनिक्कम’, ‘पलायवाना सोलाई’, ‘आरोहणम’ यांसारख्या तमिळ चित्रपटांमध्ये झळकला होता. अभिनयने डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केलंय. त्याने थुपक्की आणि अंजानमध्ये विद्युत जामवला, पैयामध्ये मिलिंद सोमण आणि काका मुत्तई मध्ये बाबू अँटोनीला आवाज दिला आहे.