प्रसिद्ध अभिनेत्याच्या सिनेमा पाहताना थिएटरमध्ये चाहत्याचं निधन… मृत्यूचं कारण जाणून बसेल धक्का

प्रसिद्ध अभिनेत्याचा सिमेमा पाहण्यासाठी आलेल्या चाहत्याच्या निधनाने थिएटर हादरलं... खुर्चीवरून जमीनीवर कोसळला आणि... मृत्यूचं कारण जाणून बसेल धक्का... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त घटनेची चर्चा...

प्रसिद्ध अभिनेत्याच्या सिनेमा पाहताना थिएटरमध्ये चाहत्याचं निधन... मृत्यूचं कारण जाणून बसेल धक्का
फाईल फोटो
| Updated on: Jan 13, 2026 | 9:02 AM

प्रसिद्ध अभिनेत्याचा सिनेमा पाहत असताना चाहत्याचं निधन झालं आहे. आनंदाने चित्रपटगृहात सिनेमा पाहत असताना चाहत्यांच्या निधन झाल्यामुळे आनंदाचं वातावरण दुःखात बदललं… ही धक्कादायक घटना हैदराबाद याठिकाणी घडली आहे. हैदराबाद येथील कुकटपल्ली येथील सिनेमागृहात ही धक्कादायक घटना घडली आहे… प्रसिद्ध अभिनेता चिरंजिवी याचा सिनेमा पाहत असताना त्याच्या चाहत्याचं निधन झालं. चित्रपटगृहात Mana Shankara Vara Prasad Garu सिनेमाचा शो सुरु असताना ही मोठी घटना घडली आहे…

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चाहत्याचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं असावं… असं सांगण्यात येत आहे. पण पोस्टमार्टननंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल.. असं पोलिसांनी सांगितलं आहे. हैदराबाद येथील कुकटपल्ली येथील अर्जुन सिनेमागृहात घटना घडली आहे. ‘Mana Shankara Vara Prasad Garu’ सिनेमाचा शो सुरु होता. संपूर्ण चित्रपटगृह प्रेक्षकांनी भारलेला होता.

प्रेक्षकांमध्ये चिरंजिवी याचा मोठा चाहता देखील उपस्थित होता. पण सिनेमा पाहत असताना तो अचानक खुर्चीवरून जमीनीवर पडला… आजूबाजूच्या लोकांना काय चालले आहे हे समजण्यापूर्वीच त्याने शेवटचा श्वास घेतला होता. थिएटर कर्मचारी आणि प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली आणि मनोरंजनाचे वातावरण शोकात बदललं.

पोलीस आणि प्रशासनाची कारवाई

थिएटर कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती मिळाली… त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि तपास सुरु करण्यात आला… पण मदत मिळण्याआधीच व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला.. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे.

मेडिकल रिपोर्ट…

मिळालेल्या माहितीनुसार, चाहत्यांचा मृतदेह अद्याप रुग्णालयात असून प्रकरणाचा तपास सुरु आहे. मृत्यूचं नेमकं कारण निश्चित करण्यासाठी मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका होता की आणखी काही हे स्पष्ट होईल. या घटनेने चित्रपटसृष्टी आणि चिरंजीवीच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे.

Mana Shankara Vara Prasad Garu सिनेमाबद्दल सांगायचं झालं, सिनेमा चिरंजिवी आणि नयनतारा एक कॉमेडी सिनेमा आहे. सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक अनिल रविपुडी यांनी केली आहे. हा सिनेमा चिरंजिवी याच्या करियर मधील सर्वात महत्त्वाचा सिनेमा मानला जात आहे. सिनेमात चिरंजिवी याच्यासोबत दग्गुबती वेंकटेश, नयनतारा, कॅथरीन थेरेसा, सचिन खेड़ेकर आणि शरत सक्सेना देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.