
कधी कोणासोबत काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आलिशान आयुष्य जगणाऱ्या एका अभिनेत्यासोबत असेच काहीसे झाले आहे. हा अभिनेता प्रसिद्धीच्या शिखरावर होता. त्याने एक दिवस घरी कॉल बॉयला बोलावले होते. त्याच्यासोबत शारीरिक संबंध निर्माण केले. नंतर नको नको तसे व्हिडीओ बनवले. हे सर्व झाल्यानंतर अचानक हा अभिनेता गायब झाला. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या तो गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना सांगितले. नंतर जे सत्य समोर आले ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.
कोण आहे हा अभिनेता?
आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत तो ब्राझिलियन अभिनेता जेफरसन मेकाडो आहे. त्याचा जन्म ब्राझिलमध्येच झाला. त्याने करिअरची सुरुवात पत्रकार म्हणून केली होती. तो दिसायला अतिशय हँडसम असल्यामुळे त्याला अनेक लोकप्रिय टीव्ही शोच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यानंतर जेफरसन ब्राझिलमधील पॉश भागात शिफ्ट झाला. त्याची ओळख सूजा रोडरिगशी झाली. सूजा हा टीव्ही चॅनेल ग्लाबोसाठी काम करत होता. जेव्हा सूजाला पैशांची गरज होती तेव्हा जेफरसनने त्याला मोठ्या रक्कमेची मदत केली होती. पैसे परत देताना सूजा जेफरसला चॅनेल ग्लाबोवर मोठी संधी देणार होता.
वाचा: पालघर हादरलं! लग्न ठरताच तरुण झाला उतावळा! सुहागरातीआधीच करु लागला ती मागणी, नंतर जे घडलं…
पाळीव श्वान रस्त्यावर आले
डिसेंबर 2022मध्ये सूजाने जेफरसनच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर एक घर भाड्याने घेतले. जेफरसनला कुत्र्यांची आवड होती. त्याच्याकडे 8 कुत्रे होते. 27 जानेवारी 2023मध्ये त्याचे हे पाळीव श्वान रस्त्यावर फिरताना दिसले. शेजारच्यांनी ते पाहिलं आणि एका NGOला माहिती दिली. कुत्र्यांच्या गळ्यातील पट्यामुळे ते कोणाचे आहेत हे लगेच कळाले. 23 जानेवारी रोजी जेफरसनचा त्याच्या आईसोबत शेवटचा फोन झाला होता. नंतर त्याचा फोन बंद येऊ लागला. सूजाकडे जेफरसनच्या घराच्या चाव्या, गाडीची चावी आणि वॉलेट देखील होते. ते पाहून कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले.
पोलिसांनी कसा शोधला आरोपी?
पोलिसांनी तपास सुरु करताच त्याचा शेवटचा फोन सूजा आणि जींडर नावाच्या एका तरुणाला गेला होता. जींडर हा कॉल बॉय होता. लोकेशन पाहिल्यानंतर जींडर आणि सूजा दोघेही 23 जानेवारी रोजी जेफरसनच्या घरी होते. पोलिसांना दोघांवर संशय आला. शेजारी राहणाऱ्या लोकांची चौकशी केली तेव्हा पोलिसांना कळाले की जेफरसन गायब झाल्यानंतर सूजाने घरात एक कंस्ट्रकशन केले. जवळपास 3 महिने जेफरसनचा शोध सुरु होता. पोलिसांनी सूजाच्या घराच्या पाठीमागे केलेले कन्स्ट्रकशन फोडण्यास सुरुवात केली. त्यांना एक मोठा बॉक्स मिळाला. त्या बॉक्समध्ये जेफरसनची डेडबॉडी सडलेल्या अवस्थेत सापडली.