Sai Tamhankar | ….म्हणून सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण, पोलिसात पोहोचल प्रकरण

अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या ड्रायव्हरने पोलिसांकडे का घेतली धाव? चार जणांविरोधात FIR दाखल... नक्की काय आहे प्रकरण? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सई ताम्हणकर हिची चर्चा...

Sai Tamhankar | ....म्हणून सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण, पोलिसात पोहोचल प्रकरण
| Updated on: Aug 16, 2023 | 11:15 AM

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री सई ताम्हणकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका धक्कादायक कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या ड्रायव्हारला चार अनोळखी तरुणांनी मारहाण केल्यामुळे प्रकरण पोलिसात पोहोचलं आहे. सई ताम्हणकर हिच्या ३२ वर्षीय ड्रायव्हरला मालवणी परिसरात चार तरुणांनी बेल्ट आणि बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. तरुण झिगझॅग पद्धतीने दुचाकी चालवत असताना अभिनेत्रीच्या ड्रयव्हरने दोनदा हॉर्न वाजवला.

ड्रायव्हर सतत हॉर्न वाजवत असल्यामुळे रागात चार जणांनी अभिनेत्रीच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण केली आहे. सई हिच्या ड्रायव्हरचं नाव सद्दाम मंडल असं आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी चार तरुणांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. सद्दाम मंडळ ताम्हणकर यांच्याकडे गेल्या सहा वर्षांपासून काम करतो.

संबंधीत प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. याप्रकणामुळे सध्या सई ताम्हणकर तुफान चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या ड्रायव्हरला होणारी मारहाण पाहिल्यानंतर सद्दाम मंडळ याचे मित्र इस्माईल खान आणि राजील अन्सारी भांडण सोडवायला आले. पण या हल्ल्यात ड्रायव्हरसह दोघे देखील जखमी झाली.

 

 

मारहाणीत जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. एवढंच नाही तर, हल्ला करणाऱ्या चार जणांपैकी एक मलिक नावाचा तरूण आहे… अशी माहिती समोर आली आहे. अशात आता या प्रकरणी पुढे काय होणार याची चर्चा रंगत आहे.

सई ताम्हणकर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री स्वतःची भक्कम ओळख तयार केली आहे. ‘मीमी’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

सई मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील सई हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.