AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा शाळेतील मराठीच्या बाई अमेरिकेत भेटतात…; संकर्षणन कऱ्हाडेने सांगितला भावनिक अनुभव

Actor Sankarshan Karhade Shared Experience in America : अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने नुकतंच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यात त्याने अमेरिकेतील एक अनुभव शेअर केला आहे. शाळेत मराठी शिकवणाऱ्या बाईंच्या भेटीबाबत संकर्षणने यात लिहिलं आहे. वाचा सविस्तर...

जेव्हा शाळेतील मराठीच्या बाई अमेरिकेत भेटतात...; संकर्षणन कऱ्हाडेने सांगितला भावनिक अनुभव
संकर्षण कऱ्हाडे, अभिनेताImage Credit source: Instagram
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 31, 2024 | 3:14 PM
Share

‘संकर्षण via स्पृहा’ या कवितांच्या कार्यक्रमानिमित्त अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि संपूर्ण टीम अमेरिकेला गेली होती. जवळपास महिनाभर अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरात ‘संकर्षण via स्पृहा’ कार्यक्रमाचे प्रयोग झाले. या प्रयोगांदरम्यानचे अविस्मरणीय अनुभव संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केलेत. यातलाच एक अनुभव म्हणजे संकर्षणच्या शाळेतल्या मराठीच्या बाई त्याला अमेरिकेत भेटल्या. यावेळी त्यांनी संकर्षणला खास बक्षीस दिलं. हा अनुभव शेअर करताना, कार्यक्रमानंतर प्रेक्षकांना भेटण्यासाठी तसा मी शांत उभा असतो पण, शाळेतील जपेबाई समोर आल्या तेव्हा खरंच भिती वाटली…, असं संकर्षणने म्हटलं आहे.

संकर्षणची पोस्ट जशीच्या तशी

माझ्या शाळेच्या “मराठीच्या बाईंनी मला बक्षीस दिलं हो…”😭 माझ्या परभणीतल्या शाळेत मला मराठी शिकवायला ह्याच जपे बाई होत्या … नेहमि मला वर्गात ऊठवायच्या आणि “कऱ्हाडे ; धडा वाच … कऱ्हाडे , अक्षर अतीशय घाण आहे…, तुझं ऱ्हस्वं दीर्घ कधी सूधरणार …??? असं म्हणायच्या… पोरांना शिकायचा कंटाळा आला (जो नेहमिच आलेला असायचा) कि, “कऱ्हाडे … गाणं म्हण” असं म्हणायच्या… आज त्याच माझ्या मराठीच्या बाई कवितांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत आल्या आणि मला कवितांसांठी बक्षीस दिलं … मला खूप भरून आलं… प्रेक्षकांना भेटतांना तसा मी शांत ऊभा असतो पण , बाई भेटायला आल्या आणि मला खरंच भिती वाटली… माझी आज शब्दांशी “जर मैत्री असेल” … तर ती बाईंनीच करून दिलीये… हे नातं तेंव्हाचं आहे जेंव्हा शाळेतल्या बाईंना “बाईच” म्हणायचो.. समजा शाळेतले गुरूजी … भाजी मंडईत जरी दिसले तरी भिती वाटायची… आणि घाबरून चालत्या सायकल वरून ऊडी मारायचो…

अभ्यासात मी कधीच हूशार नव्हतो त्यामुळे तेंव्हा बक्षीस मिळवून घरी पळत जाउन आई बाबांना ते आनंदाने सांगण्याचं सुख कधी मिळालं नाही… पण आज सांगतो आई बाबांना , बायको आणि माझ्या छोट्या मुलांनाही कि ; “माझ्या बाईंनी मला बक्षीस दिलं”

‘संकर्षण via स्पृहा’ ला प्रेक्षकांची पसंती

‘संकर्षण via स्पृहा’ या कवितांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे कविता सादर करतात. या दोघांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळतोय. रसिक या कार्यक्रमाचा प्रेक्षक मनमुराद आनंद लुटत असतात. नुकतंच या कार्यक्रमाचे अमेरिकतेच प्रयोग झाले.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना