
26 जानेवारी, देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील अनेक नामवंत व्यक्तींना पद्म पुरस्कार घोषित झाले. भारतीय सिनेमा आणि टीव्ही जगातील दिग्गज अभिनेते सतीश शाह (Satish Sha) आता या जगात नाही, मात्र त्यांच्या कामाच्या रुपाने ते आजही या जगात आहेत. अनके चित्रपट, मालिकांमधून आपल्या अभिनयाचं नाण खणखणीत वाजवणारे, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेले सतीश शाह यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नुकतीच ही घोषणा करण्यात आली. ही बातमी समोर येताच त्यांचा जवळचा मित्र आणि ‘साराभाई’ कुटुंबाचा सदस्य, त्यांचा ऑनस्क्रीन मुलगा, अभिनेता सुमित राघवन खूप इमोशनला झालाय
अभिनेते सतीश शाह यांना त्यांच्या अभिनयातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल. त्यांनी त्यांच्या अभिनयाने चित्रपट आणि दूरदर्शनवर खोलवर प्रभाव पाडला आहे. त्यांच्या पत्नी मधू शाह यांना हा पुरस्कार स्वीकारण्यास जाणार आहेत.
ऑनस्क्रीन मुलगा झाला भावूक
‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेत सतीश शाह यांनी इंद्रवदन साराभाई यांची भूमिका साकारली. त्या शोमध्येच अभिनेता सुमित राघवन हा सतीश शाह यांच्या मुलाचा, साहिल साराभाईच्या भूमिकेता दिसला. खऱ्या आयुष्यातही तो त्यांना वडिलांप्रमाणेच मानायचा. सतीश शाह यांना पद्मश्री जाहीर झाल्यावर सुमित राघवनची (Sumit Raghavan) प्रतिक्रिया समोर आली आहे. “काल त्याला त्याच्या एका आयपीएस अधिकारी असलेल्या मित्राचा फोन आला. गृह मंत्रालयाला सतीश शाह यांच्या ‘मेन फ्रायडे’ फोन नंबरची पुष्टी करायची होती जेणेकरून ते त्यांना या सन्मानाची अधिकृतपणे माहिती देऊ शकतील.” असं त्याने सांगितलं. त्यानंतर सुमितने लगेच सतीश शाह यांच्या सेक्रेटरीला फोन केला असता, तेव्हा त्याने मंत्रालयातून फोन आल्याची पुष्टी केली. हा माझ्यासाठी खूप अभिमानास्पद क्षण होता असं सुमितने सांगितलं. सतीश शाह माझ्यासाठी फक्त सीनिअर नव्हते तर ते माझे रोल मॉडेलही होते, अस त्याने मूद केलं.
तेव्हा का नाही दिला पुरस्कार ?
पुढे बोलताना सुमित म्हणाला, “ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, पण माझ्या मनात कुठेतरी असा विचार येतोय, जेव्हा कलाकार आपल्यामध्ये असतो, हयात असतो तेव्हा हे पुरस्कार का दिले जात नाहीत? जर सतीश काकांना स्वतः हा सन्मान मिळाला असता तर त्यांचा आनंद द्विगुणीत झाला असता.” असंही तो म्हणाला. (सतीश शाह यांच्या निधनाने) 25 ऑक्टोबर रोजी कुटुंबाला जे दुःख झालं, त्यावर हा पुरस्कार एखादं मलम म्हणून काम करेल असंही तो म्हणाला. सतीश काका आज जिथे असतील, तिथे हसत असतील. हा ( पुरस्कार मिळणं) फक्त त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण ‘साराभाई’ कुटुंब आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी असल्याचं त्याने सांगितलं.
सतीश शाह यांचं निधन
गेल्या वर्षी, म्हणजेच 25 ऑक्टोबर 2025 रोजी अभिनेते सतिश शाह यांचं कार्डिॲक अरेस्टने मृत्यू झाला. ते 74 वर्षांचे होते. झी5 च्या ‘यूनाइटेड कच्छे’या 2023 साली आलेल्या प्रोजेक्टमध्ये ते शेवटचे दिसले होते.