Priya Marathe : प्रिया मराठेला जाऊन 20 दिवस झाले, शंतनू मोघे पहिल्यांदाच बोलला…

मराठी, हिंदी मालिकांमध्ये गाजलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचे गेल्या महिन्यात दुर्दैवी निधन झाले. तिच्या जाण्यामुळे पती, अभिनेता शंतनू मोघेला मोठा धक्का बसला आहे, तरीही वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवत तो पुन्हा कामाला लागला आहे. प्रियाच्या जाण्यानंतर शंतनू पुन्हा मालिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच तो व्यक्त झाला आहे.

| Updated on: Sep 20, 2025 | 1:25 PM
1 / 9
अभिनेत्री प्रिया मराठे हिचे गेल्या महिन्यात (31 ऑगस्ट) कर्करोगामुळे निधन झालं. तिच्या अचानक जाण्याचे फक्त कुटुंबीय, मित्र-मंडळीनाच नव्हे तर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. गेल्या तिचा काही वर्षांपासून प्रिया कॅन्सरशी झुंजत होती, त्याच रोगाने तिचा घास घेतला. या काळात खंबीरपणे तिची साथ देणार ,तिचा पती, अभिनेता शंतनू मोघे भक्कमपण उभा राहिला

2 / 9
पत्नी प्रियाच्या जाण्यामुळे शंतनूला मोठा धक्का बसला असला तरी शो मस्ट गो ऑन म्हणत त्याने स्वत:ला सावरत पुन्हा काम सुरू केलं आहे.

3 / 9
 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत शंतनू मोघे भूमिका साकारत असून प्रियाच्या जाण्याच्या 1 दिवस आधीच या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता, प्रियाने तो पाहिला देखील.

4 / 9
प्रियाला जाऊन आता काही दिवस उलटले असून शंतननू पुन्हा काम सुरू केलं असून या सर्व कठीण प्रसंगानंतर तो पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे.

5 / 9
जवळपास 15 महिन्यांनी, शंतनू  पुन्हा प्रेक्षकांना मालिकेत दिसणार आहे. प्रियाच्या मृत्यूनंतर शंतनू मोघे पहिल्यांदाच बोलला आहे. मधल्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं आव्शयक होतं , म्हणून मी कोणत्याही कलाकृतीत दिसलो नाही.  माझ्या आयुष्यात जे वळण आलं होतं, ते पार केल्यावर मी आता पुन्हा कामाला लागलो आहे.

6 / 9
कारण माझे वडील, दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे, ते नेहमी म्हणायचे की आपण कलाकार असतो ना, ते मायबाप प्रेक्षकांचे, रसिकांचे असतो. म्हणूनच   वैयक्तिक आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात काहीच कमी पडू द्यायचं नाही. आपला व्यवसाय, काम याच्याशी प्रामाणिक रहायचं.

7 / 9
वैयक्तिक सुख-दुःख खुंटीला टांगून त्या-त्या व्यक्तिरेखेची सुख-दुःख आपलीशी करणं हा कलाकाराचा धर्म असतो, असं शंतनू मोघेने सांगितलं.

8 / 9
कलाकृतीशी असलेली कमिटमेंट कोणत्याही परिस्थितीमध्ये पाळायची, हाच कलाकारानं स्वतःशी केलेला अलिखित करार असतो. (मी) काम करत राहणं हीच प्रियाला खरी श्रद्धांजली आहे.

9 / 9
प्रिया आणि माझ्यावर, आजपर्यंत मायबाप प्रेक्षकांनी खूप, भरभरून प्रेम केलं, तीच आमची खरी ताकद आहे, असंही शंतनूने नमूद केलं.