पोपटलालचे होणार लग्न? मालिकेत मोठा ट्वविस्ट, अभिनेत्याने थेट म्हटले, निर्मात्यांनी…

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करत आहे. लोकांमध्ये एक वेगळी क्रेझ या मालिकेबद्दल कायमय राहिली. त्यामध्येच आता पोपटलालचे लग्न होणार असल्याचे मालिकेत दाखवले जात आहे.

पोपटलालचे होणार लग्न? मालिकेत मोठा ट्वविस्ट, अभिनेत्याने थेट म्हटले, निर्मात्यांनी...
Popatlal marriage
| Updated on: Jan 30, 2026 | 12:24 PM

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करत आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीचा आवडता विषय म्हणजे तारक मेहता मालिका आहे. मात्र, गेल्या काही वर्षात आपण बघितले तर अनेक जुने कलाकार मालिका सोडून गेले. काही कलाकारांनी जाताना मालिकेच्या निर्मात्यावर गंभीर आरोप केले. मात्र, प्रेक्षक जर सर्वात जास्त कोणत्या कलाकाराला मिस करत असतील तर ते म्हणजे दयाबेनला… दयाबेन अर्थात दिशा वकानी गेल्या काही वर्षांपासून मालिकेपासून दूर आहे. दयाबेनच्या भूमिकेसाठी दुसऱ्या कलाकाराला घेतले जात नाही. दिशा वकानी आज ना उद्या मालिकेत वापस येईल, अशी आशा निर्मात्यांना आहे. पत्रकार पोपटलाल अर्थात श्याम पाठक मालिकेच्या सुरूवातीपासून आहे. पत्रकार पोपटलालची भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडते. कायम नकारात्मक बोलताना आणि कॅन्सल… कॅन्सल… म्हणताना पत्रकार पोपटलाल दिसतो.

मालिकेच्या सुरूवातीपासूनच पोपटलालचे लग्न दाखवले जाते. पण पत्रकार पोपटलालचे लग्न काही होत नाही. दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पत्रकार पोपटलालचे लग्न टळल्याचे मालिकेत बघायला मिळते. दरवेळी फक्त पत्रकार पोपटलालचीच नाही तर प्रेक्षकांचीही निराशा होते. अशावेळी लोक थेट मालिकेच्या निर्मात्यांविरोधात बोलताना दिसतात. आताही मालिकेत पत्रकार पोपटलालचे लग्न जमण्याच्या अगदी जवळ असल्याचे दाखवले जातंय.

पतंग उत्साह मालिकेत सुरू असून जयपूरला गेल्याचे दाखवले जात आहे. शोची टीम जयपूरमध्ये आहे, जिथे पतंग महोत्सव दाखवला जात आहे. जयपूरची बबली आणि पोपटलाल यांच्या पतंग कट करण्यावरून स्पर्धा दाखवली जात आहे. आता पत्रकार पोपटलालचे लग्न होणार अशी परिस्थिती आहे. पण खरोखरच यावेळी लग्न होणार की, दरवेळीप्रमाणे प्रेक्षकांची निराशा होणार यावर स्वत: पोपटलाल अर्थात श्याम पाठकने भाष्य केले.

पोपटलालचे लग्न होऊ शकते, असा अॅंगल मालिकेत दाखवला जात आहे. यावर बोलताना पोपटलाल अर्थात श्याम पाठकने म्हटले की,  तुम्ही बघू शकता की,सध्या मी नवरदेवाच्या गेटअपमध्ये आहे. लवकरच लोकांना लग्नाबाबत कळेल. निर्माते एक दिवस शोमध्ये आपले लग्न करतील, असा विश्वास आहे.ज्यावेळी पत्रकार पोपटलालचे लग्न टाळले जाते, त्यावेळी लोकांमध्ये नाराजी असते. यावर बोलताना श्याम पाठकने म्हटले की, पोपटलालचे लग्न टळले की, लोक रागावतात, त्यांच्या भावना बाहेर येतात. मी या गोष्टींना सकारात्मक घेतो. मी त्यांना नक्कीच हे सांगू इच्छितो की, पोपटलालचे लग्न एक दिवस नक्कीच होणार आहे. माझ्यासारखे तुम्ही सकारात्मक करा. आशा सोडू नका.