
सध्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोची जोरदार चर्चा रंगली आहे. या शोमध्ये पाचवी इयत्तेत शिकत असलेल्या एका मुलाची चर्चा रंगली आहे. हा मुलगा शोमध्ये बिग बींशी आदराने वागणे तर सोडा, साधे नीटही बोलत नव्हता. त्यामुळे त्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि अनेकांनी त्याच्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांवरही प्रश्न उपस्थित केला. आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने यावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
अभिनेता वैभव मांगले यांनी सोशल मीडियावर केबीसीचा प्रोमो पाहून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी शंका उपस्थित केली असून भीषण वास्तवाचीही जाणून करुन दिली आहे. जर केबीसीच्या प्रसिद्धीसाठी त्या मुलाचा वापर केला गेला असेल तर… असा प्रश्न त्यांनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
वाचा: हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड लवकरच देणार गूडन्यूज, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट
काय आहे अभिनेत्याची पोस्ट?
अभिनेते वैभव मांगले यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “केबीसीच्या प्रसिद्धीसाठी त्या मुलाचा वापर केला गेला असेल तर आपण एका भीषण वास्तवात आहोत. हकनाक त्या मुलाच्या भविष्याचा बळी दिला गेला” असे म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
मुलाला मानसिक आजार?
सोशल मीडियावर केबीसीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संगीतकार कौशल इमानदार यांनी एक पोस्ट शेअर त्याला ADHD म्हणजेच Attention Deficit Hyperactivity Disorder असावा अशी शक्यता व्यक्त केली. हा विकार साधारपणे बालवयापासून सुरू होतो. त्यानंतर अनेक वर्षे या आजाराची मानसिक विकाराची लक्षणे राहतात. या आजारामुळे मुले हायपर अॅक्टिव्ह असतात. तसेच त्यांच्या वागणुकीत संतुलन राहात नाही.