AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कतरिना कैफ हिने विकी काैशल याला दिली थेट ‘ही’ मोठी धमकी, लग्नानंतर अभिनेता….

बॉलिवूड अभिनेता विकी काैशल हा कायमच चर्चेत असतो. विकी काैशल याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे विकी काैशल याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. नुकताच विकी काैशल याने अत्यंत मोठा खुलासा केलाय.

कतरिना कैफ हिने विकी काैशल याला दिली थेट 'ही' मोठी धमकी, लग्नानंतर अभिनेता....
Vicky Kaishal and Katrina Kaif
| Updated on: Aug 21, 2024 | 1:31 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. हेच नाही तर कतरिना कैफ ही तिच्या खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत असते. कतरिना कैफ हिने काही वर्षे बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला डेट केले. हेच नाही तर रणबीर कपूर याच्यासोबतही कतरिना कैफ हिचे नाव जोडले जात होते. रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांचे ब्रेकअपही कतरिना कैफ हिच्यामुळेच झाल्याचा आरोप सातत्याने केला जातो. कतरिना कैफ  हिने राजस्थानमधील सवाई माधोपुरमध्ये 2021 ला बॉलिवूड अभिनेता विकी काैशल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे यांच्या लग्नाचे खास फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होताना दिसले.

विकी काैशल याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर काही वर्ष कतरिना कैफ हिने त्याला डेट केले. कायमच कतरिना कैफ ही विकी काैशल याच्यासोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसले. नुकताच विकी काैशल याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना विकी काैशल हा दिसलाय.

विकी काैशल हा म्हणाला की, मला लग्नाच्या अगोदरच कतरिना कैफ हिने मोठी धमकी दिली. मी लग्नाच्या अगोदर ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाची अर्धी शूटिंग पूर्ण केली. लग्न झाल्यानंतर दोन दिवसांनी मला लगेचच चित्रपटाची बाकी शूटिंग ही पूर्ण करून घ्यायची होती. जेंव्हा हे  कतरिना कैफ हिला समजले, त्यावेळी तिने मला थेट लग्न न करण्याची धमकी दिली.

विकी म्हणाला की, कतरिना ही मला म्हणाली जर तुला लग्न होऊन दोन दिवसांनीच चित्रपटाच्या सेटवर परत जायचे आहे तर एक काम करू आपण लग्नच रद्द करू. मला तुझ्यासोबत लग्नच करायचे नाहीये. यानंतर विकी काैशल याने तिला प्रॉमिस केले की,  मी लग्न करून दोन दिवसांनी जरा हटके जरा बचके चित्रपटाच्या सेटवर जाणार नाही, तेंव्हा ती लग्नासाठी तयार झाली.

पुढे विकी काैशल हा म्हणाला की, लग्नाच्या 5 दिवसांनंतर मी चित्रपटाच्या सेटवर पोहोचलो. विकी काैशल याचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसला. विशेष म्हणजे सारा अली खान या चित्रपटात धमाकेदार भूमिका करताना दिसली. सारा आणि विकीच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलेच प्रेम दिले. विकी काैशल याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.