
Vijay Devarakonda Accident: दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आंध्रप्रदेशातील पुट्टापर्थी येथून हैदराबादला जात असताना त्याच्या कारला एक बलेनो कारने जोरदार धडक दिली. अभिनेत्याच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या कारचं नुकसान झालं आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघातात अभिनेत्याला दुखापत झालेली नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर विजय याच्या ड्रायव्हरने जवळच्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. टक्कर मारणारी कार न थांबता निघून गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अपघातानंतर विजय याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवर अभिनेत्याने एक पोस्ट शेअर करत प्रकृती उत्तम असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. पोस्ट शेअर करत अभिनेता म्हणाला, ‘सर्वकाही ठिक आहे… कारला टक्कर लागली आहे. पण आम्ही सर्व ठिक आहोत. मी स्टेंथ वर्कआउट देखील केलं आणि घरी परतलो आहे… डोकं दुखत आहे पण बिरयानी आणि झोप झाली की काहीही होणार नाही… तुम्हा सर्वांसाठी प्रेम… या बातमीमुळे त्रस्त होऊ नका… सर्वकाही ठिक आहे…’ अशी पोस्ट अभिनेत्याने केली आहे.
All is well ❤️
Car took a hit, but we are all fine. Went and did a strength workout as well and just got back home.
My head hurts but nothing a biryani and sleep will not fix. So biggest hugs and my love to all of you. Don’t let the news stress you 🤗❤️
— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) October 6, 2025
घटलेल्या घटनेची माहिती देत पोलीस म्हणाले, ‘तेलुगु अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या कारची आज पुट्टापर्थीहून हैदराबादला जात असताना जोगुलांबा गडवाल जिल्ह्यातील उंडवल्ली येथे दुसऱ्या वाहनाची धडक झाली. अपघातात अभिनेत्याच्या कारचं नुकसान झालं आहे. पण कोणीही जखमी झालेलं नाही…’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
रिपोर्ट्सनुसार, अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेता रश्मिका मंदाना यांनी तीन दिवसांपूर्वी साखरपुडा केल्याची माहिती समोर येत आहे… 3 ऑक्टोबर रोजी त्यांच्या साखरपुडा झाल्याची माहिती समोर येत आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विजय आणि रश्मिका एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगली होती.