
साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात झाल्याचे वृत्त आहे. विजय देवरकोंडा आंध्रप्रदेशातील पुट्टापर्थी येथून हैदराबादला जात असताना त्याच्या कारला एक बलेनो कारने जोरदार धडक दिली. त्यात अभिनेत्याची कार क्षतिग्रस्त झाली आहे. या अपघातात सुदैवाने विजय देवरकोंडा याला कोणतीही दुखापत झाली नसून तो सुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. टक्कर मारणारी कार न थांबता निघून गेल्याचे सूत्रांनी सांगितले. अपघातानंतर अभिनेत्याच्या ड्रायव्हरने या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार विजय देवरकोंडा याची कार तेलंगणाच्या जोगुलम्बा गडवाल जिल्ह्याच्याजवळ दुर्घटनाग्रस्त झाली. विजयच्या कारला एका बलेनो कारची धडक झाली. त्यामुळे विजयच्या कारचे नुकसान झाले आहे.सुदैवाने विजयला कोणतीही दुखापत झाली आहे. अभिनेता विजय देवरकोंडा शेजारील राज्य आंध्रप्रदेशातील पुट्टापर्थी येथून हैदराबाद येथे जात असताना हा अपघात घडला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला आहे.
सोशल मीडियावर अभिनेता विजय देवरकोंडा याच्या क्षतिग्रस्त कारचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात गाडीस काही खरचटल्याच्या खुणा दिसत आहेत. कारच्या डाव्या बाजूला नुकसान झाले आहे.या व्यतिरिक्त अनेक कोणतेही नुकसान झालेले नाही. अभिनेता आणि त्याचा चालक दोघे सुरक्षित आहेत. ही घटना दुपारी तीन वाजता घडल्याचे म्हटले जात आहे.विजय हैदराबादला जात असताना एक कार अचानतक उजव्या साईडला वळली त्यामुळे त्यामुळे कारची डावी बाजू या कारला धडकली.
येथे पाहा व्हिडीओ –
VIDEO | Hyderabad: Actor Vijay Deverakonda’s car was involved in a minor accident in Jogulamba Gadwal district, Telangana. The actor was unharmed.
The incident occurred while he was returning to Hyderabad from Puttaparthi in neighboring Andhra Pradesh, when another vehicle… pic.twitter.com/vSTKKIUkNv
— Press Trust of India (@PTI_News) October 6, 2025
अभिनेता विजय देवरकोंडा या अभिनेत्री रश्मिक मंदाना हीच्या साखरपुडा झाल्याची चर्चा आहे. असे म्हटले जात आहे की ३ ऑक्टोबर रोजी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा याचा साखरपुडा झाला आहे.या क्षणी दोन्ही कुटुंबातील जवळ लोक आणि मित्र परिवार उपस्थित होता.मात्र या साखरपुड्याची अधिकृत घोषणा दोघांनीही केलेली नाही.विजय देवरकोंडा याचा अलिकडेच ‘किंगडम’चित्रपट रिलीज झाला होता. थिएटर्सनंतर ओटीटीवर हा चित्रपट गल्ला जमवत आहे. तर रश्मिका मंदाना ही ‘थाम्मा’ या चित्रपटातून आयुष्मान खुराना सोबत दिसणार आहे.