अभिनेता फरहान अख्तर याच्या ड्रायव्हरने १२ लाखांचा गंडा घातला, तुम्हीही ड्रायव्हरला कार्ड देत असाल तर असे राहा सावध
जर तुम्ही तुमच्या ड्रायव्हरला कारमध्ये इंधन भरण्यासाठी स्वत:चे कार्ड देत असाल सावधान राहा. कारण अभिनेता फरहान अख्तर याच्या आईच्या ड्रायव्हरने इंधन भरण्याच्या नावाखाली त्यांना १२ लाखांना चूणा लावण्याचे उघड झाले आहे.

बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर याची आई हनी इराणी यांचा ड्रायव्हर नरेश सिंह आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्याविरोधात १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात या प्रकरणात हनी इराणी यांची मॅनेजर दीया भाटिया यांनी १ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली आहे. ड्रायव्हर नरेश सिंह याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्याशी संधान साधून एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान पेट्रोल कार्डचा दुरुपयोग केला. जर तुम्ही देखील पेट्रोल भरण्यासाठी आपल्या ड्रायव्हरला स्वत:चे कार्ड देत असतात तर सावधान राहा. तुम्हाला ड्रायव्हर शेंडी लावू शकतो. चला तर पाहूयात अशा प्रकारच्या प्रकरणात कसे रहावे सावधान..
काय आहे संपूर्ण प्रकरण
मुंबई पोलिसांनी सांगितले की फरहान अख्तर याची आई हनी इराणी यांचा ड्रायव्हर कोणतीही माहिती न देता अभिनेत्याच्या कार्डाचा वापर करत होता. ड्रायव्हर इराणी यांच्या कारमध्ये पेट्रोल भरण्याच्या बहाणे त्यांना पेट्रोल पंपावर घेऊन जायचा आणि कार्ड स्वाईप तर करायचा परंतू पेट्रोल भरायचा नाही. पोलिसांनी सांगितले की ३५ लिटर पेट्रोल क्षमतेच्या कारमध्ये ६२ लिटर पेट्रोल-डिझेल भरल्याचे बिल दाखवले जायचे. चौकशीत ड्रायव्हरने पोलिसांना सांगितले की त्याने फरहान याच्या नावाने जारी कार्डाने व्यवहार केला आहे. हे कार्ड त्याला २०२२ मध्ये अभिनेत्याच्या माजी ड्रायव्हरने दिले होते. पेट्रोल पंपवर पेट्रोल न भरताच पेट्रोल पंप कर्मचाऱ्याकडून कॅश घ्यायचा आणि त्याला कमिशन म्हणून काही हिस्सा द्यायचा. रोज ही रक्कम १००० ते १५०० दरम्यान असायची. पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरला अटक केल्यानंतर त्याने ही माहिती दिली आहे.
तुम्हीही असे सावध रहा…
तुम्ही यापासून असे वाचू शकता
– तुम्ही ड्रायव्हरला एकट्याने न पाठवता पेट्रोल भरण्यासाठी स्वत: त्याच्या सोबत जाऊ शकता
– जर तुमचा ड्रायव्हर एकटा इंधन भरण्यासाठी जात असेल तर त्याच्याकडून बिल मागा
– बिलात काही हेरफेर आढळले तर तुम्ही ड्रायव्हरला जाब विचारु शकता
– ड्रायव्हरला कार्ड बाळगण्यास देऊ नये,खूपच आवश्यकता असेल कार्ड सोपवा
– आपले बँक स्टेटमेंट वेळोवेळी चेक करत राहा
– जर कारमध्ये पेट्रोल – डिझेल प्रमाणाच्या बाहेर पडत असेल तर ड्रायव्हरला विचारा
– हरवलेल्या इंधन कार्डची लागलीच तक्रार करा
– जर ड्रायव्हर नेहमी एकाच पेट्रोल पंपातून इंधन भरत असेल तर वेळोवेळी तेथील मॅनेजरकडून त्याची माहीती घ्या
– फ्यूएल गेजची नेहमी तपासणी करत जा
