AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hurun List 2025 : शाहरुख खान भारतातलाच नाही तर जगातला श्रीमंत अभिनेता, संपत्तीत झाली इतकी मोठी वाढ

Hurun India Rich List 2025: साल 2023 मध्ये लागोपाठ तीन यशस्वी चित्रपट देणारा शाहरुख खान साल 2025 मध्ये जगातला सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये शाहरुखच्या संपत्तीने सर्वांना आश्चर्यात टाकले आहे.

Hurun List 2025 : शाहरुख खान भारतातलाच नाही तर जगातला श्रीमंत अभिनेता, संपत्तीत झाली इतकी मोठी वाढ
| Updated on: Oct 01, 2025 | 8:47 PM
Share

Shah Rukh Khan Networth 2025: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान आता संपत्तीतही किंग झाला आहे. त्याची संपत्ती 1 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. म्हणजे शाहरुख खान 12,000 कोटींचा धनी झाला आहे. 33 वर्षांपासून चित्रपट सृष्टीचा अनभिषिक्त सम्राट असलेला शाहरुख खान आता केवळ भारतातलाच नाही तर जगातला सर्वाधिक श्रीमंत अभिनेता बनला आहे. 1 ऑक्टोबर रोजी हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 जाहीर झाली आहे. यात शाहरुखच्या संपत्तीचा दाखला देत त्याला सर्वात श्रीमंत स्टार बनवले आहे.

हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार आता शाहरुख खान याची संपत्ती आता 1.4 अब्ज डॉलर म्हणजेच 12490 कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. यामुळे शाहरुख खान जगातला सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे. शाहरुख खान याच्या संपत्तीत वाढ होण्यासंदर्भात बोलताना सांगितले गेले की बॉलीवूडचा बादशाह 59 वर्षांचा झाला असून त्याने पहिल्यांदाच बिल्येनिअर क्लब जॉईंट केला आहे. त्याच्याजवळ आता 12490 कोटींची संपत्ती आहे.

जगातला सर्वात श्रीमंत अभिनेता

शाहरुख खान याच्याकडे किती संपत्ती आहे याचा अंदाज तुम्ही यावरुन लावू शकता की अभिनेता टेलर स्विफ्ट (1.3 अब्ज डॉलर), अर्नोल्ड श्वार्जेनेगर (1.2 अब्ज डॉलर ), जेरी सेनफेल्ड (1.2 अब्ज डॉलर),आणि सेलेना गोमेज (720 दशलक्ष डॉलर) सारख्या ग्लोबल स्टारच्या पुढे शाहरुख खान याची संपत्ती पोहचली आहे.

टॉप 5 मध्ये कोण ?

शाहरुख खान गेल्या अनेक वर्षांपासून भारताचा श्रीमंत अभिनेता आहे सर्वांना माहिती आहे. परंतू आता ताज्या आकडेवारीनुसार त्याला स्पर्धा करणाऱ्या अभिनेत्यांच्या आणि त्याच्या संपत्तीतील अंतर आता वाढले आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर शाहरुख खान याची सहकाही अभिनेत्री जुही चावला आहे. तिची संपत्ती 7790 कोटी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ऋतिकचे नाव असून त्याची संपत्ती 2160 कोटी आहे.

भारताचे पाच श्रीमंत अभिनेते (कुटुंब )

शाहरुख खान – 12490 कोटी रुपये

जूही चावला आणि कुटुंब- 7790 कोटी रुपये

ऋतिक रोशन आणि कुटुंब- 2160 कोटी रुपये

करण यश जौहर-  1880 कोटी रुपये

अमिताभ बच्चन आणि कुटुंब – 1630 कोटी रुपये

हुरून रिसर्च इंस्टिट्यूट दरवर्षी रिच लिस्ट सादर करते. गेल्यावर्षीही शाहरुखने टॉप केले होते. परंतू त्याची संपत्ती 870 दशलक्ष डॉलर होती. आता ती वाढून 1.4 अब्ज डॉलर झाली आहे. शाहरुख खानचे अनेक व्यवसाय आहेत.परंतू त्याची मुख्य कमाई चित्रपट आणि जाहीरातीतून होते.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.