AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : सुपर 8 मध्ये टीम इंडियाची कोणाशी टक्कर ? व्हेन्यू, वेळ आणि… जाणून घ्या A to Z माहिती..

India T20 World Cup Super 8 Matches : भारतीय संघ २०२६ च्या टी-20 वर्ल्डकपच्या सुपर-8 फेरीत पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर आता झिम्बाब्वेने सुपर 8 फेरीत एंट्री निश्चित केली आहे. भारताचा कोणकोणत्या संघाशी होणार सामना ?

T20 World Cup 2026 : सुपर 8 मध्ये टीम इंडियाची कोणाशी टक्कर ? व्हेन्यू, वेळ आणि... जाणून घ्या  A to Z माहिती..
टीम इंडियाImage Credit source: PTI
| Updated on: Feb 18, 2026 | 1:46 PM
Share

टी20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026) मध्ये जे धक्कादायक दृश्य दिसलं आहे, एका आठवड्यापूर्वी याचा विचार कोणीच केला नसेल. माजी विजेते आणि जेतेपदाच्या दावेदारांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या, संघाला ग्रुप स्टेजमधील त्यांचे सर्व 4 सामने खेळण्यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्धच्या पराभवाने ऑस्ट्रेलियाचा प्रवास आधीच संपला आहे. याचा सुपर 8 फेरीवर मोठा परिणाम झाला आहे, तिथे झिम्बाब्वेने आता ऑस्ट्रेलियाचं स्थान घेतलं आहे, ते टीम इंडियाच्याच गटात असतील. झिम्बाब्वेच्या प्रवेशामुळे टीम इंडिया कधी, कुठे आणि कोणत्या संघांशी सामना करेल हे स्पष्ट झाले आहे.

सोमवार, 16 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला. परिणामी, ऑस्ट्रेलियन संघाचे भवितव्य झिम्बाब्वे-आयर्लंड सामन्यावर अवलंबून होते. मात्र, मंगळवारी, 17 फेब्रुवारी रोजी पावसामुळे सामना रद्द करण्यात आला आणि ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. सुपर 8 साठी 8 संघांना आधीच मानांकन देण्यात आले होते, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाला ग्रुप 1 मध्ये X2 सीडिंग देण्यात आलं होतं. पण आता ऑस्ट्रेलियाऐवजी झिम्बाब्वेने या गटात प्रवेश केला आहे.

सुपर-8 मध्ये कोणत्या ग्रुपमध्ये कोणता संघ ?

झिम्बाब्वेने सुपर-8 मध्ये प्रवेश केल्याने या फेरीत प्रवेश करणाऱ्या सात संघांचे चित्र स्पष्ट झाले आहे. भारत आणि झिम्बाब्वे व्यतिरिक्त, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनीही पुढील फेरीत प्रवेश केला आहे. आता, पाकिस्तान आणि अमेरिका यांची अंतिम स्थानासाठी स्पर्धा आहे. आज, 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पाकिस्तान-नामिबिया सामन्याद्वारे हे फायनल होईल. पण या सात टीमच्या आगमनाने कोणता संघ कोणत्या गटात असेल हे स्पष्ट झाले आहे. आधीच ठरलेल्या सीडिंगनुसार, भारतीय संघाला ग्रुप 1 मध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत येथे दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे आहेत. इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांनी आधीच ग्रुप 2 साठी पात्रता मिळवली आहे, तर पाकिस्तान किंवा अमेरिका यापैकी एका संघाचा समावेश असेल.

सुपर-8 मध्ये टीम इंडियाचं शेड्यूल

ग्रुप 1 मधील चार संघ अंतिम झाले आहेत, त्यामुळे टीम इंडियाचे वेळापत्रक आता स्पष्ट झाले आहे. सुपर 8 फेरी ही, शनिवार 21 फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे, परंतु टीम इंडियाचा या फेरीत रविवार, 22 फेब्रुवारी रोजी प्रवास सुरू होईल.

सुपर-8 मध्ये टीम इंडियाचं शेड्यूल असं असेल –

22 फेब्रुवारी – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – संध्याकाळू 7:00 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

26 फेब्रुवारी- भारत विरुद्ध झिम्बाब्वे- चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम – संध्याकाळी 7 पासून

1 मार्च- भारत विरुद्ध वेस्टइंडीज- कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियम – संध्याकाळी 7 वाजल्यापासून सामना पार पडणार आहे.

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान