AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या समस्यांमध्ये मोठी वाढ, कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक, ते प्रकरण…

एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या समस्यांमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. 2018 मधील एक प्रकरण चांगलेच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय. अभिनेत्रीला कधीही अटक केली जाऊ शकते. यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्येही आता चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या समस्यांमध्ये मोठी वाढ, कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक, ते प्रकरण...
Akshara Singh
| Updated on: Sep 10, 2024 | 4:57 PM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंग हिच्याबद्दल अत्यंत मोठी आणि हैराण करणारी बातमी पुढे येताना दिसत आहे. ज्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय. अक्षरा सिंगच्या विरोधात अटकेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे अभिनेत्रीच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. बिहारच्या खगरिया दिवाणी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. मुळात म्हणजे 2018 चे हे सर्व प्रकरण आहे. आता अभिनेत्रीला कधीही अटक होऊ शकते. 

अक्षरा सिंगचा एक सांस्कृतिक कार्यक्रम होणार होता, ज्यामध्ये अभिनेत्रीन येणार होती. सर्व तयारी देखील करण्यात आली. मात्र, शेवटी अभिनेत्रीने येण्यास नकार दिला. अभिनेत्रीने येण्यास नकार दिल्यानंतर उपस्थित लोकांनी मोठी तोडफोड केली. ज्यानंतर हे प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले. खगरिया न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी हिम शिखा मिश्रा यांनी हा आदेश दिला आहे.

अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. आता अक्षरा सिंग हिला कधीही अटक होऊ शकते. टेंट हाऊसचा मालक शुभम कुमार याने 2018 मध्ये अक्षरा सिंग हिच्यासोबत चार जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. शुभम कुमार याचे म्हणणे होते की, अक्षरा सिंग कार्यक्रमाला येणार असल्याने सर्व तयारी करण्यात आली. 

अक्षरा सिंग प्रत्यक्षात कार्यक्रमात हजर न झाल्याने लोकांनी रागाच्या भरात सर्व साहित्याची तोडफोड केली आणि जाळपोळही केली. यामुळे लाखोंच्या घरात आपले नुकसान झाले. शहीद किशोर कुमार मुन्ना यांच्या स्मरणार्थ 2018 मध्ये जेएनकेटी मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

अक्षरा सिंग या कार्यक्रमाला उपस्थित राहिली नाही. वकील अजिताभ सिन्हा यांनी सांगितले की, न्यायालयाने दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेतली. आता अभिनेत्रीला कोणत्याही क्षणी अट ही होऊ शकते. यामुळे अभिनय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ निर्माण झाल्याचे देखील बघायला मिळतंय. 

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.