AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amruta Khanvilkar : लग्नाच्या 11 वर्षांनंतर मोडणार अमृताचा संसार, क्रिप्टिक पोस्ट करत म्हणाली, ‘प्रेम हरवलं…’

Amruta Khanvilkar : लग्नाच्या 11 वर्षांनंतर अमृता खानविलकर हिच्या आयुष्यात मोठं वादळ... घटस्फोटापर्यंत पोहोचलं नातं..., क्रिप्टिक पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, 'प्रेम हरवलं...', सध्या सर्वत्र अमृताच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Amruta Khanvilkar : लग्नाच्या 11 वर्षांनंतर मोडणार अमृताचा संसार, क्रिप्टिक पोस्ट करत म्हणाली, 'प्रेम हरवलं...'
Amruta Khanvilkar
| Updated on: Aug 05, 2026 | 11:35 AM
Share

Amruta Khanvilkar : इंडस्ट्रीमध्ये कधी कोणाचं नातं जुळेल आणि कधी कोणाच्या नात्याचा अंत होईल काहीही सांगता येत आहे. आता देखील असंच काही झालं आहे. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अमृता आणि पती हिमांशू मल्होत्रा आता एकत्र राहत नाही. गेल्या 18 महिन्यांपासून दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. अमृता हिच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री ‘प्रेम हरवलं…’ असं देखील म्हटलं आहे..

इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत अमृता खानविलकर म्हणते, ‘आापण काय बोलतो, आपल्याला काय म्हणायचं आहे… आणि आपल्याला काय सांगायचं असतं आणि आपण काय बोलतो यामध्ये बऱ्याचदा प्रेम हरवून जातं…’, अमृताच्या अशा पोस्टनंतर घटस्फोटाच्या चर्चांनी अधिक जोर धरल आहे. पण यावर अभिनेत्री अद्याप कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. सांगायचं झालं तर, सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त अमृताच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृता आणि हिमांशूच्या जवळच्या व्यक्तीने दोघे विभक्त होत असल्याचं सांगितलं आहे. सध्या दोघे वेगळे राहत आहेत आणि त्यांच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे… हे ठरवण्यासाठी ते वेळ घेत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे पण घटस्फोटाच्या चर्चांवर अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांनी कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाही.

अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2015 मध्ये अमृता आणि हिमांशू यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नाआधी जवळपा 10 वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. पण आता लग्नाच्या 11 वर्षांनंतर अमृता आणि हिमांशू यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.

अमृता आणि हिमांशू यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं तर, ‘नच बलिए’ शेमध्ये दोघे एकत्र झळकले आणि शोच्या सातव्या पर्वात विजयी देखील झाले. हिमांशू याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो देखील हिंदी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. गुजराती आणि हिंदी मालिकांमधील हिमांशू लोकप्रिय चेहरा आहे. अनेक सिनेमांमध्ये देखील त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी