AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut : तुम्ही तर माझ्यापेक्षा पण चांगला अभिनय करता हो, फालतूमध्ये..बैठकीत कंगना रणौतने चांगलचं सुनावलं

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत या नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात अडकत असतात. त्यांचा स्पष्टवक्तेपणा वादांना निमंत्रण देतो. बॉलिवूडमध्ये तर त्यांनी अनेकांशी पंगा घेतला आहे.

Kangana Ranaut : तुम्ही तर माझ्यापेक्षा पण चांगला अभिनय करता हो, फालतूमध्ये..बैठकीत कंगना रणौतने चांगलचं सुनावलं
Kangana Ranaut
| Updated on: Sep 05, 2026 | 5:05 PM
Share

भाजप खासदार कंगना रणौत या आक्रमकता आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. अनेक सामाजिक मुद्यांवर त्या वेळोवेळी स्पष्टपणे मतं मांडत असतात. त्यासाठी कंगना यांना टीका आणि ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागतो. चित्रपट सृष्टीतील अनेकांसोबत त्यांचे वाद सुरु असतात. हिंदुत्ववादी विचारांचं समर्थन करणाऱ्या कंगना राणौत यांनी आता अधिकाऱ्यांना फटकारलं आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून त्या खासदार आहेत. ‘डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कोऑर्डिनेशन एंड मॉनिटरिंग कमेटी’ बैठकीत कंगना रणौत यांनी MPLADS स्कीम अंतर्गत निधीचं धीम्या गतीने वापर सुरु आहे, त्यावरुन अधिकाऱ्यांना चांगलचं झापलं.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कंगना रणौत यांनी खासदार निधीवरुन नाराजी प्रगट केली. माझ्या खासदार निधीमध्ये 11 कोटी रुपये उपलब्ध आहेत. पण अधिकाऱ्यांनी केवळ 50 लाख रुपये खर्च केलेत. कंगना यांनी बीडीओ लेव्हलच्या अधिकाऱ्याला या विलंबाबद्दल प्रश्न विचारले. काय खर्च केलाय, त्याचा रिपोर्ट मागितला. बैठकीत कंगन राणौत यांनी कठोर शब्द वापरले. मला फुकटमध्ये या खोट्या गोष्टी सांगू नका. मला प्रत्येक दिशा कमिटीच्या बठैकीत हेच ऐकायला मिळतं.

खर्चाचे आकडे यात ताळमेळ दिसत नाहीय

“जेव्हा मी दिशा कमिटीच्या बैठकीत MPLADS फंडाबद्दल विचारलं, तेव्हा मला काही अडचण नाही म्हणून सांगण्यात आलं. जवळपास 90 टक्के फंड खर्च झालाय असं सांगितलं. पण जे सांगितलं आणि वास्तवातले खर्चाचे आकडे यात ताळमेळ दिसत नाहीय” असं कंगना म्हणाल्या. एक खासदार म्हणून नॅशनल मीडियामध्ये माझ्या कामाची खिल्ली उडवली जात आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना टोमणा मारताना म्हटलं की, तुम्ही तर माझ्यापेक्षा चांगला अभिनय करता.

काही अपशब्दांचा सुद्धा वापर केला

कंगना यांनी आरोप केला की, MPLADS फंडाची 30 ते 40 टक्के रक्कम बनावट लोकांमध्ये वाटण्यात आली आहे आणि पैशाची वसुली होत नाहीय. विकास फंडाच्या व्यवस्थापनावरुन त्यांनी काही अपशब्दांचा सुद्धा वापर केला. “लोक प्रलंबित असलेल्या विकास योजनांवर रिल्स बनवत आहेत आणि अधिकारी कार्यालयात बसून हसतायत” असं कंगना म्हणाल्या. मतदारसंघातील थांबलेल्या विकास प्रकल्पांना गती द्या असे त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. उपलब्ध खासदारनिधीचा योग्य पद्धतीने वापर करण्यास त्यांनी सांगितलं.

Follow Us
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...