AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गंभीर आजाराच्या विळख्यात सापडताच नवरा, सासरच्यांनी हाकललं, सलमान खानने वाचवले अभिनेत्रीचे प्राण, आता जगतेय चाळीत

आलिशान आयुष्य जगणारी अभिनेत्रीवर चाळीत राहण्याची आली वेळ, गंभीर आजार होताच नवऱ्याने सासरच्यांना हाकललं, सलमान खान मदतीसाठी आला धावून... आता असं आयुष्य जगतेय अभिनेत्री..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

गंभीर आजाराच्या विळख्यात सापडताच नवरा, सासरच्यांनी हाकललं,  सलमान खानने वाचवले अभिनेत्रीचे प्राण, आता जगतेय चाळीत
सलमान खान
| Updated on: May 03, 2026 | 9:34 AM
Share

अभिनेत्रीला ओळखलं? तिचं नाव आहे पूजा डडवाला… अभिनेता सलमान खान स्टारर ‘वीरगती’ सिनेमातून पूजा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्या सिनेमातून तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण पूजा हिच्या नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं. पूजा हिचा पहिलाच सिनेमा फ्लॉप ठरला. पण पूजा चर्चेत आली. पण त्याचा देखील काहीही फायदा झाला नाही. तिला सिनेमात काम मिळणं बंद झालं. अशात पूजा हिने टीव्ही विश्वात काम करण्याचा निर्णय घेतला. टीव्ही विश्वात देखील पूजा हिला यश मिळालं नाही. नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवलं होतं. पूजा हिनच्या आयुष्याने असं वळण घेतले की ती मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचली होती. सलमानच्या मदतीने तिने मृत्यूवर मात केली आणि नव्याने आयुष्याची सुरुवात केली.

रिपोर्टनुसार, सिनेमा आणि टीव्ही विश्वात अपयश आल्यानंतर सर्वकाही सोडून अभिनेत्रीने लग्न केलं आणि गोव्यात नवऱ्यासोबत राहून लगली. गोव्यात अभिनेत्री नवऱ्यासोबत कॅसिनो चालवत होती. पण 2018 मध्ये पूजा हिच्या आयुष्यात मोठं संकट आहे… अभिनेत्रीला कळलं की, तिला एका गंभीर आजाराने ग्रासलं आहे… अभिनेत्रीला टीबी हा आजार झालेला… अशात तिचं वजन देखील कमी झालं.

पूजा हिने आठ वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, टीबीमुळे माझ्याकडे एकही पैसा उरला नव्हता. नवरा, सासरचेच नाही तर, कुटुंबियांनी देखील अभिनेत्रीला सोडून दिलं. चहा – पाण्यासाठी देखील दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ अभिनेत्रीवर आली. पैशांअभावी अभिनेत्रीला योग्य उपचार मिळू शकले नाहीत आणि परिणामी, पूजा हिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली.

पूजा हिची अवस्था तेव्हा समोर आली तिचा एका व्हिडीओ समोर आला.. ज्यामध्ये पूजा हिने स्वतःच्या परिस्थितीबद्दल सांगितलं होतं. तिची अवस्था पाहून सर्वजण थक्क झाले. सलमान खानच्या ‘बीइंग ह्युमन’ या एनजीओ पुढे येऊन पूजाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलला. पूजाने सांगितलं की, सलमानच्या एनजीओ तिच्या औषधांपासून ते जेवणापर्यंत, डायपर आणि इतर आवश्यक वस्तूंपर्यंत सर्व काही पुरवलं. आज ती जिवंत आहे, ते केवळ सलमान खानमुळेच.

गंभीर आजारावर मात केल्यानंतर देखील पूजा हिच्या अडचणी कमी झाल्या नाही. घरच्यांनी बाहेर काढल्यामुळे, ती परत घरी तरी कशी जाणार होती? आज पूजा मुंबईतील एका चाळीत राहते… पूजा म्हणालेली, मित्र राजेंद्र सिंग याच्या मदतीने अभिनेत्रीने टिफिन सेवा सुरु केला. लागणाऱ्या सर्व वस्तू राजेंद्र याने पुरवल्या. आज पूजा मुंबईतील एका चाळीत टिफिनचा व्यवसाय सुरु केला.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...