
Actress Life: अनेक अभिनेत्री आहे ज्यांनी सिनेमाची गरज म्हणून बोल्ड आणि इंटिमेट सीन दिले आहे. सर्व टीमसमोर असे सीन शूट करणं फार कठीण असतं. पण पूर्ण काळजीपूर्वक इंटिमेट सीन शूट केले जातात. पण अनेकदा हेच सीन अभिनेत्रींसाठी धोक्याची घंटा ठरतात. समाज आणि कुटुंबियांकडून देखील अभिनेत्रींवर टीका केली जाते. यामुळे जवळच्या नात्याला देखील तडा जाते. असंच काही 32 वर्षीय अभिनेत्रीसोबत झालं आहे. तेव्हा ‘अशी मुलगी नसलेली बरी…’ असं वक्तव्य अभिनेत्रीच्या आईने केलं होतं.
2019मध्ये ‘आय लव्ह यू’ नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला. हा एक कन्नड सिनेमा आहे, ज्यामध्ये अभिनेत्री रचिता राम मुख्य भूमिकेत होती. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता उपेंद्र मुख्य भूमिकेत होता. सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. पण सिनेमा अभिनेत्रीच्या आई – वडिलांना आवडला नव्हता.
सिनेमाच्या कथेची गरज म्हणून अभिनेत्रीला एक बोल्ड सीन द्यावा लागला. पण मुलीने मोठ्या पडद्यावर केलेलं काम अभिनेत्रीत्या आई – वडिलांना बिलकूल आवडलं नाही. सिनेमानंतर रचिताने तिच्या आयुष्यात आलेल्या मोठ्या बदलांबद्दल सांगितलं.
सीन पााहिल्यानंतर अभिनेत्री आई तिला म्हणाली, ‘एक अभिनेत्री म्हणून तुझ्या कामाचा मी स्वीकार करेल. पण एक मुलगी म्हणून कधीच तुझ्या कामाचा स्वीकार करणार नाही.’ आईचे हे शब्द ऐकल्यानंतर अभिनेत्रीने लगेच आई – वडिलांची माफी मागितली.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्यासाठी माझं कुटुंब सर्वकाही आहे. कुटुंबानंतर जे काही असेल ते असेल… माझ्या आई – वडिलांसाठी मी एक चांगली मुलगी आहे आणि जे माझ्याकडून झालं आहे, त्यासाठी मला प्रचंड वाईट वाटत आहे… हे मी कुटुंबियांसमोर सांगू शकत नाही. मी स्वतःला एक मुलगा समजते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.
रचिता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2013 मध्ये अभिनेत्रीने अभिनय विश्वात पदार्पण केलं. आता ती कन्नड विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.