Disha Patani : बहिणीची इन्स्टा स्टोरी, संत प्रेमानंद यांचं नाव आणि… दिशा पटानीच्या घरावरील गोळीबाराबद्दल मोठे अपडेट्स

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर शुक्रवारी गोळीबार झाला होता, यामुळे मोठी खळबळ माजली. याबद्दलचे बरेच अपडेट्स समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या घराबाहेर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि फरा होण्यात यशस्वी झाले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Disha Patani : बहिणीची इन्स्टा स्टोरी, संत प्रेमानंद यांचं नाव आणि... दिशा पटानीच्या घरावरील गोळीबाराबद्दल मोठे अपडेट्स
दिशा पटाणीच्या घरावर गोळीबार
| Updated on: Sep 13, 2025 | 9:22 AM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी हिच्यावर सध्या संकटांचा डोंगरच कोसळला आहे. बरेलीतील तिच्या घरावर काल रात्री गोळीबार करण्यात आला. तिच्या घरावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्याने एकच खळबळ माजली. वीरोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलिस या संपूर्ण घटनेचा कसून तपास करत आहेत. मात्र अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार कसा झाला याची माहिती समोर आली आहे. दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी सटासट गोळ्या झाडल्या व ते पळून गेल्याचे समोर आले आहे.

दिशाच्या घरावरील गोळीबाराबद्दल मोठी अपडेट

बरेलीतील ज्या घरावर गोळीबार झाला, त्या घरात दिशाची आई-वडील आणि बहीण खुशबू पटाणी हे तिघे राहतात. त्यांच्या घरावर पहाटे 4.30 च्या सुमारास जोरदार गोळीबार झाला. अभिनेत्रीच्या घराबाहेर दोन गोळ्या झाडण्यात आल्याची बातमी समोर आली, सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. महत्वाची माहिती अशी की, गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोर हे दिशा पटानीच्या घराची रेकी करण्यासाठी आले होते. गोळीबाराच्या वेळी, दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले होते आणि त्यांनी धडाधड फायरिंग केल्याचे समोर आले आहे.

कुठून आले हल्लेखोर ?

दिल्ली लखनौ महामार्गावरून घुसून हल्लेखोर दिशाच्या घराजवळ आले आणि त्यांनी फायरिंग केलं. नंतर त्याच महामार्गावरून हल्लेखोरो बरेलीहून निघून गेले. गोळीबाराच्या या घटनेनंतर सध्या पोलिस दिशा पटानीच्या घरापासून ते महामार्गापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत हल्लेखोरांचा माग काढत आहेत. हे फायरिंग करण्यासाठी आलेल्या गुन्हेगारांनी बरेली शहराचा परिसर सोडला आणि अवघ्या 7 ते 8 मिनिटांत ते हायवेवर पोहोचले. बाहेरून आलेल्या गुन्हेगारांनी ही घटना घडवून आणली. अभिनेत्रीच्या घरावर 2/3 बर्स्ट फायर करण्यात करण्यात आला. 7 राउंड गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

या संपूर्ण प्रकरणात बरेली पोलिस एसपी अनुराग आर्य यांनीही माहिती दिली आहे.

 

दिशाच्या घरावर फायरिंग का ?

जुलै महिन्यात दिशा पटानीची बहीण खुशबू पटानीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये अनिरुद्धाचार्यांबद्दल काही वादग्रस्त टिपण्णी केली होती अशी माहिती समोर आली आहे. तिचे विधान प्रथम प्रेमानंद जी महाराजांशी जोडले गेले होते, ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर खुशबू पटानीन स्पष्ट केलं की तिने ती कमेंट प्रेमानंद महाराजांसाठी नव्हे तर अनिरुद्धाचार्य यांच्यासाठी केली होती.

काही दिवसांनी, खुशबूने अनिरुद्धाचार्य यांचा व्हिडिओ देखील पोस्ट केला ज्यावर त्यांची टिप्पणी व्हायरल झाली होती. आता या प्रकरणामुळे तिच्या घरावर गोळीबार करण्यात आला. गोल्डी ब्रार टोळीच्या गुंडांनी या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. दिशाच्या बहिणीला इशारा देणारे एक निवेदनही जारी केले आहे.