
Actress Life: राजघराण्यातील मुलींचं आयुष्य आलिशान असेल, त्यांना कधीच कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत नसेल… असं तुमच्या मनात देखील अनेकदा आलं असेल. पण असं नाही आयुष्य म्हणलं की चढ-उतार हा जगण्याचा आणि आयुष्याचा एक भाग आहे. त्यामुळे समोर आलेल्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं… हे आपल्या स्वभावावर अवलंबून असतं. सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री आहे, जीने बॉलिवूडमध्ये पदार्पण तर केलं, पण अभिनेत्रीला प्रसिद्धी आणि लोकप्रियता इतर अभिनेत्रींप्रमाणे मिळाली नाही. अशात अभिनेत्रीने खासगी आयुष्यात देखील अडचणींचा सामना केला आहे.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अदिती राव हैदरी आहे. आदितीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मल्याळम सिनेमा ‘प्रजापती’ (Prajapathi) मधून केली होती. पण प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यात देखील अभिनेत्रीला हवं तसं यश मिळालं नाही.
अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने वयाच्या 21 व्या वर्षी अभिनेता सत्यदीप मिश्रा याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अभिनेता सत्यदीप मिश्रा याने फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिच्यासोबत लग्न केलं आहे. तर अदिती हिने अभिनेता सिद्धार्थ याच्यासोबत लग्न केलं.
अदिती राव हैदरी आणि सत्यदीप मिश्रा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघे एकमेकांना जवळपास 17 वर्षांपासून ओळखत होते. त्यांच्या ओळखीचं हळू-हळू प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नानंतर मात्र दोघांमध्ये खटके उडू लागले. म्हणून लग्नाच्या दोन वर्षांनंतर सत्यदीप आणि अदिती यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. 2013 मध्ये सत्यदीप आणि अदिती यांचा घटस्फोट झाला.
अदिती राव हैदरी हिच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री राजघराण्यातील आहे. अकबर हैदरी यांची नात असण्यासोबतच ती आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे. आदितीचे आई हिंदू आणि वडील मुस्लिम आहेत. अदिती तिच्या आडनावात आई आणि वडील दोघांची नावे लिहिते.
आमिर खान आणि अदिती यांचं नातं…
किरण राव आणि अदिती राव हैदरी या चुलत बहिणी आहेत. किरण राव हिचे आजोबा वानपार्थीचे राजा जे. रामेश्वर राव होते, जे आदिती राव हैदरी हिचे आजोबा होते. त्यामुळे ते दोघेही हैदराबादच्या राजघराण्यातील आहेत. किरण राव ही अभिनेता आमिर खान याची दुसरी पत्नी आहे.