प्रसिद्ध अभिनेत्रीचं लक्षवेधी वक्तव्य, ‘सलमानला लोकं घाबरतात, इंडस्ट्रीमध्ये माझ्यासोबत…’
Salman Khan: इंडस्ट्रीमध्ये सलमान खानचा दबदबा, त्याच्या संपर्कात असलेल्या अभिनेत्रींना कशी मिळते वागणूक, प्रसिद्ध अभिनेत्रीचं लक्षवेधी वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेत, सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत...

Salman Khan: अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सांगायचं झाल तर, गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तर इंडस्ट्रीमध्ये दंबग खान दबदबा आहे… असं देखील अनेकदा समोर आलं आहे. शिवाय सलमान खान याच्या संपर्कात असलेल्या लोकांना इंडस्ट्रीमध्ये फार त्रास सहन करावा लागत नाही… असं देखील अनेकदा समोर आलं आहे. नुकताच प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमान खान याच्याबद्दल आणि इंडस्ट्रीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.
सलमान खान आणि इंडस्ट्रीबद्दल स्वतःचं मत व्यक्त करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री एली अवराम आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘सलमान खान याच्यामुळे माझ्यासोबत कधीच कोणी गैरवर्तन केलं नाही. मी सलमान खान याच्या संपर्कात आहे. अनेक वर्षांनंतर अखेर आमची भेट गणपतीत झाली.. कोणासोबत संपर्क चांगले ठेवण्यास मी मागे आहे. पण सलमान खान त्याच्या ओळखीतल्या लोकांच्या कायम संपर्कात असतो. तो कोणाला विसरत नाही…’
‘मी माझ्या एका वेगळ्या विश्वात असते. मी स्वतःवर प्रचंड काम करते… अशा अनेक गोष्टी असतात ज्यावर तुमचं नियंत्रण असायला हवं हे अत्यंत गरजेचं आहे… कारण तुम्ही दुसऱ्या देशात राहाता… विशेषतः जेव्हा तुम्ही एकटे राहत असता… मी आजपर्यंत कधीच कोणाकडून मदत मागितली नाही… माझ्या वडिलांकडून देखील मी आता मदत मागत नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
सलमान खान याच्याबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
सलमान खान याच्या स्वभावाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘सलमान खान त्याच्या माणसांची योग्य ती काळजी घेतो… त्यासाठी मी कायम आभारी राहिल… माझ्या आयुष्यात तो एका देवदुतासारखा आला… इतक्या वर्षांमध्ये मुलींना इंडस्ट्रीमध्ये अनेक वाईट अनुभव आले आहेत. मला हळू – हळू कळलं की इंडस्ट्रीमध्ये लोकं सलमान खानला घाबरतात. त्यामुळे ते गैरवर्तन करण्यास घाबरतात… काळजी घेण्याचा सलमानचा हा चांगला मार्ग आहे… त्यासाठी मी आभारी आहे…’ सांगायचं झालं तर, सलमान खान आणि एवी अवराम यांनी एकत्र काम देखील केलं आहे.
